lover and wife murder husband at fatehpur 
देश

नवऱयाने दोघांना 'त्या' अवस्थेत पकडले मग...

वृत्तसंस्था

फतेहपूर (उत्तर प्रदेश): पत्नीने घरी नवरा नसल्यामुळे प्रियकराला बोलावून घेतले. मध्यरात्री अचानक नवरा आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी तपासानंतर दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. यशवंतलाल सिंह (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यशवंतलाल यांचे गावामध्ये घर आहे. शेती करून ते नोकरी करत होते. यशवंतलाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. यामुळे 2015 मध्ये प्रतीक्षा नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला होता. प्रतिक्षाचे दुसऱया व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. यशवंतलाल कामानिमित्त बाहेर गेले की ती प्रियकराला बोलवत असे. यशवंतलाल कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे प्रतिक्षाने प्रियकराला घरी बोलावले. परंतु, यशवंतलाल मध्यरात्री घरी परतला. दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दोघांनी मिळून यशवंतलालचा गळा कापून हत्या केली. या घटनेनंतर प्रियकर पळून गेला. मध्यरात्री प्रतिक्षा जोरजोरात रडू लागली. यामुळे शेजारी धावत आले. यावेळी चोरांनी खून केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर प्रतिक्षा अडकली. अखेर तिने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे सांगितले.

दरम्यान, प्रतिक्षा आणि प्रियकर संग्राम सिंगला अटक करण्यात आली. दोघांनी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

Jayakwadi dam drowning incident: जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन-साई यांची विकेट अन् वैभव सूर्यवंशीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड... अहमदाबादमध्ये नोंदवला भन्नाट विक्रम

Vat Purnima 2026: अधिक मासामुळे वटपौर्णिमा उशिरा; जाणून घ्या योग्य तारिख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

SCROLL FOR NEXT