LPG Cylinder Price Sakal
देश

LPG Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी! 100 रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर

Amit Ujagare (अमित उजागरे)

LPG Cylinder Price: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी एलीपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ९९.७५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळं हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. (LPG Cylinder latest Price in August 2023 LPG cylinder became cheaper)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील गॅसचे दर

  1. मुंबई - (११०२.५० घरगुती), (१६४०.५० व्यावसायिक)

  2. ठाणे - (११०२.५०), (१६४०.५०)

  3. नागपूर - (११५४.५०), (१८६४.५०)

  4. पुणे - (११०६), (१७०१)

  5. नाशिक - (११०६.५०), (१७१६)

  6. छत्रपती संभाजीनगर - (११११.५०), (१७४५)

  7. कोल्हापूर - (११०५.५०), (१६६०)

  8. सातारा - (११०७.५०), (१७०८)

  9. सोलापूर - (१११८.५०), (१७३२)

  10. सिंधुदुर्ग - (१११७), (१६८७)

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये बदल नाही

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (14.2 किलो) दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्याच्या राजधानीत मुंबईत घरगुती गॅसचा दर ११०२.५० रुपये इतका आहे. या किंमतीत शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता.

तीन वर्षात घरगुती गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या घरगुती गॅस सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच यावरील सबसिडी देखील बंद झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT