LPG Price Hike | LPG Cylinder Rate Updates
LPG Price Hike | LPG Cylinder Rate Updates esakal
देश

LPG Price Hike : दूध, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरही झाला महाग

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेन युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे.

LPG Price Hike : रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलीय. यापूर्वीही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली होती. याच्या काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दुधाचे दरही प्रतिलिटर दोन ते पाच रुपयांनी वाढवले ​​होते. (LPG Cylinder Rate Updates)

आजपासून (मंगळवार) 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. काही महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढण्यात आले आहेत. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपये झालीय. पूर्वी ते 899.50 रुपये होते.

'या' शहरांत दर खूप जास्त

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 976 रुपयांवर पोहोचलीय. यापूर्वी कोलकात्यात त्याची किंमत 926 रुपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 987.5 रुपयांवर पोहोचलीय. तर, पाटण्यात 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1047.5 रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई, चेन्नईतही वाढले दर

मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 949.5 रुपयांवर पोहोचला आहे. इथं त्याची किंमत 899.5 रुपये होती. दुसरीकडं चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 965.5 रुपये झाला आहे. यापूर्वी शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 915.5 रुपये होता.

पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel Price Today) आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात बराच काळ कोणताही बदल झालेला नव्हता. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर, 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. तर दुसरीकडं रशिया-युक्रेन युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागलं

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झालीय. त्यामुळं दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 रुपये प्रति लिटर झालाय. तर दुसरीकडं एक लिटर डिझेलचा दर 86.67 रुपयांवरून 87.47 रुपये प्रति लिटर झाला आहे. याआधी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT