LPG-Gas 
देश

LPG गॅससाठी आता डिस्ट्रिब्युटर निवडता येणार; जाणून घ्या कसं?

महाराष्ट्रात पुण्यातून होणार सुविधेला पहिल्यांदा सुरुवात

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तुम्हाला आता कोणत्याही आवडत्या डिस्ट्रिब्युटरकडून स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर रिफिल करता येणार आहे. घरगुती गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ही नवी सुविधा आणली असून लवकरच प्रायोगिक तत्वावर याला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला केवळ पुण्यातील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयानं गुरुवारी ही मोठी घोषणा केली.

मंत्रालयानं घोषणा करताना म्हटलं की, LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना आता आपला घरगुती सिलेंडर रिफील करण्यासाठी डिस्ट्रिब्युटर निवडीचं स्वातंत्र्य असणार आहे. सध्या ही सुविधा सुरुवातीच्या टप्प्यात असून लवकरच ती लॉन्च केली जाणार आहे. देशातील चंदीगड, कोईम्बतूर, गुरगाव, पुणे आणि रांची या शहरांमध्ये सुरुवातीला हा सुविधा उपलब्ध असणार आहे, असंही मंत्रालयानं सांगितलं आहे.

डिजिटल LPG पोर्टेबिलिटी कसं काम करेल?

ग्राहकाला मोबाईल अॅपवरुन किंवा कस्टमर पोर्टलवरुन सिलेंडर बुक करताना लॉगिन केल्यानंतर गॅस सिलेंडर घरपोच देणाऱ्या डिस्ट्रिब्युटर्सची एक यादी दिसेल या यादीपुढे त्या डिस्ट्रिब्युटरचं परफॉर्मिंग रेटिंगही दिसेल. या यादीतून ग्राहक आपल्याला आवडेल त्या डिस्ट्रिब्युटरची निवड करु शकतो. या सेवेचा उद्देश हा केवळ ग्राहकहित हाच नसून यामुळे निवडीचा अधिकार आणि डिस्ट्रिब्युटर्सना चांगल्यात चांगली सुविधा देण्यासाठी चांगली स्पर्धा निर्माण व्हावी हा उद्देश आहे.

या डिजिटल मोडशिवाय ग्राहक आपला गॅस सिलेंडर उमंग अॅप किंवा भारत बिल पे सिस्टिम आणि प्लॅटफॉर्मवरुनही बुक करु शकतील. त्याचबरोबर ग्राहक यासाठी प्रसिद्ध ई-कॉमर्स अॅप विझ, अॅमेझॉन आणि पेटीएमवरुन पेमेंट करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे सुखदा खांडकेकरला ऐकावे लागलेले टोमणे; मग अभिनेत्रीने ठरवून घेतला तो निर्णय

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

Manchar Rain Update : आहुपेत ४०७ मिमी, भीमाशंकरमध्ये २९७ मिमी पाऊस; डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

Ambegaon Heavy Rain : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले; ओढ्या, नाल्यांना पुर, शेतात रस्त्यावर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT