An image depicting domestic LPG gas cylinders symbolizing the central government’s possible decision on LPG subsidy and its impact on household expenses.

 
sakal
देश

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Central Government’s Proposed Decision on LPG Subsidy : सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यात अमेरिकन निर्यातदारांसोबत वार्षिक पुरवठा करारांवर स्वाक्षरी केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Is LPG Subsidy Likely to Be Discontinued? : केंद्र सरकार एलपीजी सबसिडीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एलपीजीच्या सबसिडीच्या हिशोबाबबत नव्याने विचार केला जाऊ शकतो. कारण, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यात अमेरिकन निर्यातदारांसोबत वार्षिक पुरवठा करारांवर स्वाक्षरी केली.

आतापर्यंत, सबसिडीची गणना सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस (सीपी) वर आधारित केली जात होती, जो पश्चिम आशियातील एलपीजी पुरवठ्यासाठी एक मानक दर होता. तर, सरकारी मालकीच्या तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना या सूत्रात अमेरिकन बेंचमार्क किंमत आणि ट्रान्सअटलांटिक शिपमेंटच्या उच्च मालवाहतुकीचा खर्च समाविष्ट करायचा आहे.

ईटीच्या अहवालानुसार, सौदी CPच्या तुलनेत किंमत सवलत शिपिंग खर्च भागवण्यासाठी पुरेशी असेल तरच अमेरिकेतील एलपीजी भारतासाठी परवडेल. अमेरिकेतील शिपिंग खर्च सौदी अरेबियापेक्षा अंदाजे चार पट जास्त आहे.

गेल्या महिन्यात, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजी आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला, हा करार २०२६ साठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT