Pitbull dog Sakal
देश

मालकिणीला मारलेल्या पिटबुलचे सरकारी पिंजऱ्यात नखरे; साधं जेवण नको पण...

या पिटबुलला आता पिंजऱ्यात ठेवण्यात आलं असून तो अस्वस्थ आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका ८० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर लखनौ प्रशासनाने या कुत्र्याला ताब्यात घेतलं आहे. या कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (Pitbull killed 80 years old woman)

चार सदस्यांची समितीही या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. ही समिती या कुत्र्याने आपल्या मालकिणीवर हल्ला का केला याचा तपास करत आहे. आता या पिटबुलला (Pitbull) आता पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा कुत्रा वैतागलेला दिसत आहे. एसी खोलीमध्ये वावरण्याची सवय असलेल्या कुत्र्याला आता पिंजऱ्यामध्ये राहण्याची अडचण होत आहे. खाण्याच्या वेळीही त्याने बरेच नखरे केले आहेत. प्रशासनाने या कुत्र्याला दूध बिस्कीट, डाळ-चपाती , डॉग मील खायला दिलं. मात्र त्याने ते खाल्लं नाही.

त्यानंतर पेडिग्री दिल्यावरही या कुत्र्याने थोडंसंच खाल्लं आहे. सरकारी पशुवैद्यक अधिकारी डॉ. अभिनव शर्मा यांनी सांगितलं की संध्याकाळी पिटबुलने नॉर्मल डॉग फूड खाल्लं नाही. पण रात्री चार चिकन लेगपीस दिले, तेव्हा त्याने हे आवडीने खाल्लं. सकाळीही त्याने लेगपीस खाल्ले आहेत. सध्या हा पिटबुल घाबरला आहे, त्याच्यात आत्ता कोणतीही आक्रमकता दिसत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT