Luxury items found in conman Sukesh Chandrasekhar   crying inside jail cell video from Mandoli jail
Luxury items found in conman Sukesh Chandrasekhar crying inside jail cell video from Mandoli jail  
देश

Video : कारागृहात सुकेशच्या सेलवर छापा; सापडली लाखोंची चप्पल, 80 हजारांची जीन्स अन् बरंच, मग…

सकाळ डिजिटल टीम

फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या मंडोली कारागृहात बंद आहे. दरम्यान सुकेशच्या सेलवर प्रशासनाकडून छापे टाकण्यात आले.

यावेळी त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची चप्पल आणि 80 हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स जप्त करण्यात आल्या. या छापेमारीनंतर सुकेश ढसाढसा रडायला लागला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सुकेश चंद्रशेखर मंडोली कारागृहात आहे. जेलर दीपक शर्मा आणि जयसिंग यांनी सीआरपीएफसोबत सुकेशच्या सेलवर छापा टाकला. यावेळी सुकेश चंद्रशेखर स्तब्धच राहीला. मात्र छापा संपल्यानंतर सुकेश दीपक शर्मा आणि जयसिंग यांच्यासमोर ढसाढसा रडू लागला. 

कारागृहातील सुकेशच्या कोठडीत सापडलेले साहित्य पाहून अधिकारीही चकित झाले. या छाप्यात सुकेशकडून दीड लाख रुपये किमतीची गुच्ची चप्पल आणि 80 हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स सापडल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर याला २०० कोटींच्या फसवणूकीप्रकरणी अटक केली असून तो तिहार जेलमध्ये आहे. मात्र त्याने तिहार जेलमध्ये देखील अधिकाऱ्यांना लाच देऊन अय्याशी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला अनेक अॅक्ट्रेस जेलमध्ये भेटायला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

महाठक म्हणून प्रसिद्ध असलेला चंद्रशेखर जेलमध्ये बसून अनेक बॉलिवुड अभिनेत्रींशी संबंध देखील तयार केले. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अपराध शाखेने सुकेश विरोधात १३४ पानांचे तीसरे सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

या प्रकरणाच्या पोलिसांनी कून चौकशी केली. EWO ने दिलेल्या माहितीनुसार जेलमधील संपूर्ण स्टाफ यामध्ये सामिल होता. वरपासून खालपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना सुकेश पैसे देत होता. तेही एका महिन्याला एक कोटी. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सुकेशजवळ जेलमध्ये वर्षभर आयफोन 12 प्रो आणि आयफओन 11 होता. हे फोन वापरूनच तो जेलमधून बाहेरच्या लोकांची फसवणूक करत होता. त्यांच्याकडून पैसे वसूल करत होता.

वर्षभरात त्याने जेलमध्ये बंद बिझनेसमनच्या पत्नीकडून तब्बल २०० कोटी रुपये वसूल केले . कित्येकदा पैसे घेण्यासाठी जेल स्टाफमधील लोकांनी त्यांच्याच गाडीत पाठवलं जायचं.

ईओडब्लू च्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार पिंकी ईराणी हिनेच बॉलिवुड अभिनेत्रींशी त्याची ओळख करून दिली. ज्यामध्ये जॅकलीन फर्नांडीस आणि नोरा फतेही यांच्यासोबतच अनेक नावांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या चौकशीत पिंकी इराणीने अनेक खुलासे केले आहेत. सुकेशने जॅकलीन, नोरा यांना अनेक महागडे गिफ्ट दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT