M Vanita and Ritu Karidhal handle operation of Chandrayaan 2
M Vanita and Ritu Karidhal handle operation of Chandrayaan 2 
देश

Chandrayaan 2 : या महिलांनी सांभाळली 'चांद्रयान-2'ची धुरा 

वृत्तसंस्था

चांद्रयान-2 या मोहिमेची धुरा दोन महिलांच्या हाती होती. एम. वनिता या प्रकल्प संचालक (प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर) आहेत, तर रितू करिधल या मिशन डायरेक्‍टर आहेत. 

"आम्ही महिला व पुरुष असा भेदभाव करत नाही. इस्रोमध्ये सुमारे 30 टक्के महिला कार्यरत आहेत,'' असे चांद्रयान-2 ची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी म्हटले होते. महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. इस्रोच्या यापूर्वीच्या मंगळ मोहिमेवेळी आठ महिलांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. 

प्रकल्प संचालक एम. वनिता : उपग्रहांविषयीच्या प्रकल्पावर या बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिस्टिम्स इंजिनिअर असलेल्या वनिता यांनी डिझाईन इंजिनिअरिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने त्यांचा 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला आहे. चांद्रयान-2च्या प्रकल्प संचालक असल्याने या मोहिमेची सर्व कामे त्यांच्याच देखरेखीखाली पार पाडली जाणार आहेत. या इस्रोमधील एकमेव प्रकल्प संचालक आहेत. चांद्रयान-1 मोहिमेतही वनिता यांनी प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती. "डेटा हॅंडलिंग' या क्षेत्रातील त्या तज्ज्ञ आहेत. भारताच्या दूरसंवेदन उपग्रहांच्या "डेटा हॅंडलिंग सिस्टिम्स' सांभाळण्याचे काम त्या करत होत्या. प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी घेण्यास त्यांनी सुरवातीला नकार दिला होता. परंतु, इस्रो उपग्रह केंद्राचे तत्कालीन संचालक एम. अण्णादुराई यांच्या आग्रहामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. "नेचर' या नियतकालिकाने या वर्षातील दहा प्रमुख महिला शास्त्रज्ञांमध्ये वनिता यांच्या नावाचा समावेश केला आहे. 

रितू करिधल : रितू यांनी लखनौ विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मंगळ मोहिमेवेळी त्यांनी डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्‍टर म्हणून काम केले होते. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना 2007 मध्ये यंग सायंटिस्ट ऍवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे. रितू यांना लहानपणापासून विज्ञानाची आवड होती. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्याबाबतच्या बातम्यांची कात्रणे त्या शालेय वयापासून जमवत असत. विज्ञानाशी संबंधित सर्व लहान-मोठ्या गोष्टी समजून घेण्याचा त्यांचा लहानपणापासून प्रयत्न होता. भौतिकशास्त्र आणि गणित हे त्यांचे आवडीचे विषय. चंद्राच्या कलांबाबत त्यांना नेहमीच उत्सुकता वाटत असे, तसेच अवकाशातील अंधाराच्या पलीकडे काय आहे? असा प्रश्नही त्यांना पडत असे. विज्ञानाबद्दलच्या आवडीमुळेच त्या इस्रोमध्ये आल्या. बंगळूर आयआयटीमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी इस्रोमध्ये काम करण्यासाठी अर्ज केला होता. अनेक उमेदवारांमधून त्यांची निवड झाली. गेल्या 20-21 वर्षांपासून त्या इस्रोमध्ये काम करत आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. त्यात मंगळ मोहीम खास आहे. आई-वडिलांनी माझ्यावर 20-25 वर्षांपूर्वी जो विश्‍वास दाखविला, त्यामुळेच या टप्प्यापर्यंत मजल मारू शकले, असे रितू यांचे म्हणणे आहे. 

'चांद्रस्वारी'साठी पाऊल 
"चांद्रयान 2' या भारतीय अवकाश मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच यान उतरविण्यात येणार आहे. कोणत्याही देशाने दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेतून फक्त भारतच नाही, तर चंद्राविषयी संपूर्ण मानव जातीला असणारे ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. जगभरातील अवकाश संशोधन क्षेत्रासाठी या मोहिमेचे महत्त्व मोठे आहे. भारताच्या या आधीच्या "चांद्रयान - 1' आणि "मंगळयान' या अवकाश मोहिमा भारताची या क्षेत्रातील तंत्र सिद्धता तपासणाऱ्या होत्या. "चांद्रयान -2' या मोहिमेतून सूर्यमालेसंबंधी अनुत्तरीत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT