देश

Madhya Pradesh Election : लाडली बहना विरुद्ध ओल्ड पेन्शन योजना! मध्य प्रदेशात मतदारांच्या मनात काय?

नरेश हारनोळ : सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत दिसून आली. भाजपाने महिलांसाठीच्या लाडली बहना योजनेवर भर दिला असला तरी काँग्रेसच्या ओल्ड पेन्शन योजनेला भाजपकडे काहीही 'काऊंटर' नसल्याचे मतदारांचे म्हणने आहे.

भाजपाने आपल्या घोषणापत्रामध्ये लाडली बहना योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देतानाच प्रचार सभांमध्ये महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेची राज्यात चर्चा असली तरी काँग्रेसने नारी सन्मान योजना, बीटीया राणी आणि योजनातून पंधराशे आणि अकराशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याची घोषणा काँग्रेसने केल्याने महिला लाडली बहना या योजनेला किती प्रतिसाद देतात, याबाबत मतदार महिलांमध्ये साशंकता आहे.

विशेषतः काँग्रेसने जाहीर केलेल्या ओल्ड पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता जाणकारांसह ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. राज्यातील एकूण मतदारांपैकी मोठा वर्ग ओल्ड पेन्शन योजनेपासून दुरावल्याने नाराज आहे.

भाजप सरकारने ओल्ड पेन्शन योजना सुरू करण्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे काँग्रेस जर ओल्ड पेन्शन सुरू करणार असेल तर सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो, ओल्ड पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेची आहे.

- शिशिर विश्वकर्मा, भोपाळ

लाडली बहन योजनेतून महिलांना आर्थिक मदत आणि हक्काचे घर भाजपा देणार आहे, यामुळे महिला सक्षमीकरणाला पाठबळ मिळेल भाजप सरकारच्या काळात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.

- आरती, महिला मतदार

सरकारी नोकरी सगळ्यांनाच मिळत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नसेल तर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यासाठी ओल्ड पेन्शन योजना गरजेची आहे.

- रमाकांत शुक्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT