Madhya Pradesh Opinion Poll 
देश

Madhya Pradesh Opinion Poll: शिवराज चौहान की कमलनाथ...जनतेचा कौल कुणाला? NDTV चा सर्व्हे काय सांगतो

कार्तिक पुजारी

भोपाळ- नोव्हेंबर महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहेत. तर कमलनाथ यांच्या दाव्यानुसार जनता आता चौहान यांना कंटाळली आहे. एनडीटीव्हीने सीएसडीएस(CSDS)-लोकनीति(LOKNITI) यांच्यासोबत मिळून जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवराज सिंह सरकारवर ६१ टक्के जनता समाधानी

गेल्या काही वर्षात शिवराज सिंह चौहान यांनी अनेक योजना जनतेसाठी सुरु केल्या आहेत. त्यांच्या या योजनांबाबत समाधानी असल्याचं ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी म्हटलं आहे. सर्व्हेनुसार, २७ टक्के लोकांनी शिवराज सरकारच्या कामावर पूर्णपणे समाधानी असल्याचं म्हटलंय. तर, ३४ टक्के लोकांनी काही प्रमाणात समाधानी असल्याचं म्हटलंय. याचा अर्थ जवळपास ६१ टक्के जनतेने शिवराज सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं म्हटलंय. ३४ टक्के लोकांनी शिवराज सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या कामावर ६५ टक्के समाधानी

मध्य प्रदेशच्या जनतेने एनडीटीव्हीच्या सर्व्हेमध्ये केंद्रातील सरकारच्या कामामुळे समाधानी असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारने उज्वला योजना, जनधन योजना आणि आवास योजना अशा काही योजना जनतेसाठी आणल्या आहेत. त्यांच्या या कामामुळे ६५ टक्के जनतेने समाधानी असल्याचं म्हटलं आहे. तर २९ टक्के लोकांनी आपण फारसे समाधानी नसल्याचं म्हटलं आहे.

शिवराज की कमलनाथ?

मध्य प्रदेशमध्ये गेल्या जवळपास २० दशकापासून भाजपची सत्ता आहे. २०१८ मध्ये काँग्रेसच्या कमलनाथ यांनी सत्ता स्थापन केली होती. पण, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपप्रवेशामुळे २०२२० मध्ये त्यांचे सरकार पडले होते. एनडीटीव्हीच्या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशची जनता शिवराज सरकारच्या कामाने ३६ टक्के समाधानी आहे, कर कमलनाथ सरकारच्या कामाने ३४ टक्के समाधानी आहे. ११ टक्के लोक दोन्ही पक्षांबाबत असमाधानी आहेत.

चुरशीची लढत

२०१८ मधील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. एडीटीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार यावेळीही काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मध्य प्रदेशात ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. त्यादिवशी सर्व चित्र समोर येईल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT