Madhya Pradesh Assembly Elections esakal
देश

'किसीं की भी सरकार आये, बस्स मजे कर रही हैं..'; तरुणाईत सरकारविरोधात संताप, मतदान कोणाच्या पारड्यात?

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गोरगरीब आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्या तरुणांना आर्मीत नोकरीची संधी होती, ती सुद्धा हिरावली गेलीये.

-नरेश हाळनोर

Madhya Pradesh Assembly Elections : बेरोजगारी, वाढती महागाई, पेपरफुटी, भ्रष्टाचार यामुळे वैतागलेली तरुणाई राज्यात कोणतेही सरकार येवो ते फक्त मजा करतात. सत्तेत येणाऱ्यांना राज्याच्या कोणत्याही समस्येची देणे-घेणे नाही. सत्तेत येण्यासाठी फक्त घोषणा केल्या जातात. प्रत्यक्ष त्या घोषणा सत्तेत आल्यानंतर सोयीस्करपणे विसरतात.

आम्ही तरुण मात्र या लोकांच्या हातचे भावली बनून राहतो अशा शब्दात तरुणाई व्यक्त होत आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शिक्षणाच्या निमित्ताने, तसेच सैर सपाटा न्यू मार्केट या परिसरात आलेल्या तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी आपली मतं बिनधास्तपणे व्यक्त केली.

सतना इथून भोपाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या शुभम सैन म्हणतो की, आर्मी भरतीसाठी दहावी झाल्यापासून प्रयत्न करत होतो. भरती झाली नाही. नंतर शासनाने अग्निवीर भरती सुरू केली. या भरतीला विरोध व्हा म्हणून अनेकांनी आत्महत्या केल्या. त्याचा सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. चार वर्षे नोकरी करून आलेल्याला कुठलाही मोबदला मिळणार नाही. मग, त्याचा उपयोग काय? गोरगरीब आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्या तरुणांना आर्मीत नोकरीची संधी होती, ती सुद्धा हिरावली गेली.

राज्यात पेपर फुटी होऊन परीक्षा रद्द होत आहेत. नव्याने भरती होत नाही. खासगी क्षेत्रात नौकऱ्या नाहीत. आम्ही काय करायचं, असा उद्दिग्न सवाल त्याने केला. प्रकाश गौर याने, महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, त्या तुलनेत उत्पन्न वाढत नाही. शेतकऱ्याचा गहू 15 रुपयांनी घेतला जातो. पण, बाजारात तोच गहू 45 रुपये किलोने विकला जातो.

तेल 160 रुपये, पेट्रोल 110 रुपये, रेल्वेचे तिकीट किमान 50 रुपयांनी वाढले. 25 वर्षाचा होऊनही हाताला काम नाही. सरकारी नौकरीसाठी भरती नाही, प्रत्येक वेळी पेपर लीक होतो. 250 जागांसाठी 25 लाख अर्ज येतात. काय करायचं आम्ही? अशा शब्दात आपली व्यथा मांडली. रामचरण सिंह याने, कोरोनाकाळात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोना झाला तर ते खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झाले, का त्यांना सरकारी हॉस्पिटलवर विश्वास नव्हता का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT