MP News 
देश

लेकीने केलं मुस्लीम मुलाशी लग्न! आई-वडिलांना ओळखण्यासही नकार; संतप्त पित्याने थेट कफन...

Sandip Kapde

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एका हिंदू मुलीने तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न केले. त्यानंतर ती मुंबईला गेली. दीड वर्षापूर्वी ही मुलगी एका मुस्लिम पुरुषासोबत पळून गेली होती, ज्यामुळे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तिला शोधून काढले आणि तिला नाहरगढ पोलिस ठाण्यात जबाब देण्यास सांगितले. तिने कबूल केले की तिने तिच्या धर्माबाहेर लग्न करण्यासाठी घर सोडले होते. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचेही तिने नमूद केले आहे. मुलीने तिच्या आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला.  (MP News)

यानंतर तिने आपल्या वकिलासोबत नरगढ पोलीस स्टेशन गाठले आणि लग्नाची कागदपत्रे दाखवली. यानंतर तिच्या वडिलांना बोलावण्यात आले. मात्र संतापलेल्या वडिलांनी तिच्या अंगावर कफन व हार टाकला आणि नातं नेहमीसाठी संपवलं. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

"माझी मुलगी कॉलेजला जायची. दीड वर्षापूर्वी ती कॉलेजला जात असताना बसस्थानकावरून बेपत्ता झाली होती. तिचे अपहरण झाले होते की कोणासोबत पळून गेले होते याबाबत काहीही माहिती नाही. दीड वर्षानंतर ती वकिलासोबत पोलिस ठाण्यात आली आणि कागदपत्रे दाखवली. त्यांचा हा निर्णय मला मान्य नाही ना समाजाला. माझ्या मुलीला मृत मानून मी कफन घालून निरोप घेतला आहे," असे मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

SCROLL FOR NEXT