देश

...म्हणून अफ्रिकन चित्त्यासाठी निवडण्यात आले MP तील कुनो ठिकाण

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतात 70 वर्षांनंतर चित्ते दिसणार आहेत. नामिबियामधून आज आठ चित्ते भारतात दाखल झाले. नामिबियातून विशेष विमानाने आठ आफ्रिकन चित्त्यांना भारतात आणलं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशातील विस्तीर्ण जंगलामध्ये 748 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले, कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान आठ आफ्रिकन चित्यांचे नवीन घर बनणार आहे. कोणत्याही मानवी वसाहतीशिवाय, हा प्रदेश आता छत्तीसगडमधील कोरियाच्या साल जंगलांच्या अगदी जवळ आहे, जिथे मूळ एशियाटिक चित्ता जवळपास 70 वर्षांपूर्वी दिसला होता.

2010 ते 2012 दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील दहा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर असे आढळून आले की, कुनो जंगल चित्यांच्या आधीवासासाठी परिपूर्ण आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ने हवामान बदल, शिकार, प्रतिस्पर्धी भक्षकांची संख्या आणि ऐतिहासिक श्रेणी यावर आधारित केलेल्या मूल्यांकनावर हे ठिकाण चित्यांच्या आधीवासासाठी परिपूर्ण असल्याचे म्हंटले होते.

मानवी वस्ती नाही

जरी चित्ता माणसांची शिकार करत नसला किंवा मोठ्या पशुधनावर हल्ला करत नसला तरीही मानवांशी संघर्ष होण्याची शक्यताही या ठिकाणी कमी आहे. त्याचबरोबर जंगल विस्तृत असल्यामुळे त्यांना धोकाही कमी होईल. त्याचबरोबर चित्याला सर्वात वेगवान प्राणी म्हणून देखील ओळखले जाते.

त्याचबरोबर, लोकसंख्येची घनता आणि कमी होणारी खुली गवताळ मैदाने यामुळे भारतातील प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.

कुनो हे बहुधा देशातील काही वन्यजीव स्थळांपैकी एक आहे. जेथे वर्षापूर्वी उद्यानाच्या आतून सुमारे 24 गावे आणि त्यांच्या पाळीव जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गावातील ठिकाणे आणि त्यांची कृषी क्षेत्रे आता प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत.

त्याचबरोबर या जंगलात बिबट्यांची लक्षणीय संख्या आहे. पुरेशी शिकार आणि इतर घटक उपलब्ध असल्यामुळे दोघेही जंगलात एकत्र राहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT