Madras High Court esakal
देश

बलात्कार पीडितांच्या 'टू फिंगर टेस्ट'वर मद्रास हायकोर्टाची बंदी

सकाळ डिजिटल टीम

बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं राज्याला दिलेत.

Ban On Two Finger Test : बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर (Two Finger Test) तत्काळ बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं (Madras High Court) राज्याला दिले आहेत. मद्रास हायकोर्टानं बलात्कार पीडितांच्या डॉक्टरांच्या टू फिंगर टेस्टच्या सरावावर तत्काळ बंदी घालण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत. हा आदेश न्यायमूर्ती आर. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती एन सतीश कुमार यांनी दिलाय.

न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरली जात आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयानं (High Court) सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) हवाला देत म्हटलंय की, सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे ही चाचणी गोपनीयतेच्या अधिकाराचे, शारीरिक आणि मानसिक अखंडतेचं आणि बलात्कार पीडितांच्या प्रतिष्ठेचं उल्लंघन करते, असं नमूद केलंय.

नेमकं काय आहे प्रकरण?

खरं तर, खंडपीठ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करत होते. या व्यक्तीनं जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण 16 वर्षांच्या मुलीच्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. मुलीची टू फिंगर चाचणी घेतल्यानंतर न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं आणि त्याला POCSO कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

खंडपीठाचा महत्वाचा आदेश

वरील न्यायालयीन निर्णय लक्षात घेता, टू फिंगर चाचणी चालू ठेवू दिली जाऊ शकत नाही याबद्दल आम्हाला शंका नाही. त्यामुळं लैंगिक गुन्ह्यातील पीडितांवर वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे केल्या जाणाऱ्या टू-फिंगर टेस्टच्या सरावावर तत्काळ बंदी घालण्याचे निर्देश आम्ही राज्य सरकारला जारी करतो, असं खंडपीठानं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT