Madarsha Team eSakal
देश

मदरशांचं रुपांतर शाळांमध्ये होणार; न्यायालयाचा हिरवा कंदील

मदरशांचं रुपांतर शाळांमध्ये करण्यास विरोध करणाऱ्या 13 याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Guwahati High Court) एका प्रकरणावर सुनावणी करताना मदरशांबद्दल (Madarsa) अत्यंत महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. मदरसे म्हणजे अल्पसंख्याकांनी स्थापन केलेल्या संस्था नाहीत. त्या करदात्यांमुळे चालतात. त्यामुळे अशा मदरशांचे शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणलेल्या नव्या कायद्याच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती सौमित्र सैकिया म्हणाले की, राज्यात आणलेला हा बदल केवळ सरकारी निधीतून चालणाऱ्या मदरशांसाठी आहे असं न्यायालयाने सांगितलं.

आसाम रिपीलिंग ऍक्ट 2020 च्या वैधतेला आव्हान देणारी रिट याचिका फेटाळताना न्यायालयाने गेल्या वर्षी दाखल झालेल्या 13 झालेल्या 13 याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने म्हटलंय की, “राज्यघटनेच्या कलमांनुसार आपल्यासारख्या बहु-धर्मीय समाजात एका धर्माला राज्याने दिलेले प्राधान्य कलम 14 आणि 15 च्या उद्दीष्टांना बाधा पोहोचवणारं आहे. संविधानानुसार सरकारी निधीतुन चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही.

या प्रकरणी न्यायालयाने 27 जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण करून शुक्रवारी निर्णय राखून ठेवला होता. या मदरशांतील शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आल्या नसून गरज पडल्यास त्यांना इतर विषय शिकवण्याच्या सुचना देण्यात येतील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT