atiq ahmed esakal
देश

Atiq Ahmed : 'मन्नत'वर चालणार बुलडोजर, अतिक अहमदचं आहे कनेक्शन...

माफिया अतिक अहमदच्या मृत्यूनंतर त्याच्या अवैध संपत्तीच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अतिकची अवैध संपत्ती आणि त्याच्या टोळीच्या काळ्या कमाईकडे सरकारने मोर्चा वळवला असून प्रयागराज पोलिसांनी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा शोध लावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराजः माफिया अतिक अहमदच्या मृत्यूनंतर त्याच्या अवैध संपत्तीच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अतिकची अवैध संपत्ती आणि त्याच्या टोळीच्या काळ्या कमाईकडे सरकारने मोर्चा वळवला असून प्रयागराज पोलिसांनी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा शोध लावला आहे.

ग्रेटर नोएडाच्या सेक्टर ३६च्या ए ब्लॉकमध्ये १०७ व्या क्रमांकावर माफिया अतिक अहमदची मालमत्ता आहे. एखाद्या हवेलीसारखा त्याचा हा बंगला आहे. त्याची किंमत सुमारे ४.४ कोटी इतकी आहे. अतिकच्या घराचे नाव मन्नत असं आहे.

प्रयागराजचे पोलिस कमिश्नर रमित शर्मा यांनी अतिक अहमदचा मन्नत बगला गँगस्टर कायद्यांतर्गत संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. कलम १४ (१) नुसार जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांचं एक पथक ग्रेटर नोएडा येथे जाऊन मन्नत बंगला ताब्यात घेणार आहे.

जप्तीच्या कारवाईदरम्यान दवंडी देऊन घोषणा करण्यात येणार आहे. असिस्टंट पोलिस कमिश्नर श्वेता पांडेय यांच्या नेतृत्वामध्ये प्रयागराज पोलिसांची एक टीम पुढच्या आठवड्यात ग्रेटर नोएडा येथे जाऊन अतिकची प्रॉपर्टी जप्त करणार आहे. अतिक अहमदने काळ्या पैशांच्या जोरावर नोएडातील मन्नत बंगला बांधल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.

अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या धर्तीवर अतिकने त्याच्या कोठीचं नाव मन्नत ठेवलं होतं. आता तो बंगला जप्त होणार आहे.

पोलिसांना तपासादरम्यान मन्नत बंगल्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. या काळात प्रशासन, विकास प्राधिकरण, बँक यांचीही मदत घेण्यात आली. प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि दोघांवर गोळीबार केल्यानंतर माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम काही काळ या मन्नत कोठीत वास्तव्याला असल्याचं स्पष्ट झालं आहे. घरात आधीच पैसे लपवून ठेवल्याचा संशय आहे. असद आणि गुलाम हे दोघे ग्रेटर नोएडा येथील या घरात केवळ पैसे गोळा करण्यासाठी गेले होते, असंही तपासामध्ये पुढे आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT