देश

होय! अधिकतर प्रोडक्ट्स 'अनहेल्दी'; मॅगी बनवणाऱ्या कंपनीने केलं मान्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: आपण जे अन्न खातो ते आपल्यासाठी खरंच तितकं आरोग्यदायी आहे का? याचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा थेट संबंध आपल्या खाण्यापिण्याशी असतो. कोरोनाकाळात या खाण्याबाबत केलेली ढिलाई मोठ्या प्रमाणावर नुकसानकारक ठरू शकते. घरी जेंव्हा काही खायला नसतं किंवा काहीतरी वेगळं आणि झटपट बनवता येईल, असं खायची इच्छा असते तेंव्हा आपण मॅगी नूडल्सला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतो. ही मॅगी नेहमीच वादग्रस्त राहिली आहे आणि आता या मॅगीबाबतचा असाच एक रिपोर्ट सध्या समोर आलाय जो विचार करण्यासारखा आहे.

मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीचा एक अंतर्गत रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये कंपनीने मान्य केलंय की, नेस्ले कंपनीचे 60 टक्क्यांहून अधिक फूड आणि ड्रींक प्रोडक्ट्स हे 'अनहेल्दी' आहेत. ते अधिक हेल्दी बनवण्यावर सध्या काम सुरु आहे.

काही प्रोडक्ट्स कायमच राहतील 'अनहेल्दी'

एस्ले, मॅगी नूडल्स, किटकॅट आणि नेस्कॅफे बनवणाऱ्या नेस्लेने एका इंटरनॅशनल डॉक्यूमेंटमधून या गोष्टीला मान्य केलंय. तसेच त्यांनी म्हटलंय की, त्यांचे 60 टक्क्यांहून अधिक खाद्य आणि पेय उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने तितकेसे लाभदायक नाहीयेत. जगातील सर्वांत मोठ्या फूड कंपनीने हे देखील मान्य केलंय की, त्यांची काही खाद्य उत्पादने कधीच हेल्दी असणार नाहीयेत. हे प्रोडक्ट्स असे आहेत, ज्यावर कितीही काम केलं तरी ते अनहेल्दीच असणार आहेत.

37 टक्के अन्नपदार्थांना दिलंय 3.5 टक्के रेटींग

UK बिजनेस डेली फायनान्शियल टाइम्सच्या बातमीत म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटींग सिस्टीमनुसार नेस्लेच्या केवळ 37 टक्के फूड आणि पेय प्रोडक्ट्सचं रेटींग 3.5 हून अधिक होतं. या सिस्टीमनुसार, फूड प्रोडक्ट्सना 5 पैकी गुण दिले जातात. मात्र, कंपनीच्या पाणी आणि डेअरी प्रोडक्ट्सची कामगिरी उत्तम आहे.

कंपनीने काय म्हटलंय?

या अहवालाला उत्तर देताना नेस्ले SA च्या प्रवक्त्याने म्हटलंय की, आमची उत्पादने त्यांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करतात आणि संतुलित आहारासाठी मदत करतात. यासाठीच कंपनी सध्या काम करत आहे. कंपनीने पुढे आपल्या निवेदनात म्हटलंय की, आम्ही गेल्या दोन दशकांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि मीठ लक्षणीय प्रमाणात कमी केले आहे, अलीकडच्या काही वर्षांत आम्ही पौष्टिक मानकांची पूर्तता करणारी हजारो उत्पादने मुलांसाठी आणि कुटूंबासाठी बाजारात आणली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT