देश

DM bought liquor: दारुची बाटली विकत घ्यायला स्वतः गेले कलेक्टर; दुकानदाराने लावला चुना

Liquor Case: जिल्हाधिकारी बन्सल हे एका सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहिले आणि दारुची बाटली खरेदी केली. त्यांनी McDowell's ची बाटली घेतली. त्या बाटचीली किंमत ६६० रुपये होती. परंतु त्यांच्याकडून ६८० रुपये उकळण्यात आले.

संतोष कानडे

District Magistrate bought liquor: दारु दुकानदाराकडून सातत्याने फसवणूक आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शेवटी जिल्हधिकाऱ्यांनीच याची खातरजमा करण्याचं ठरवलं. स्वतः कलेक्टर दारु घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यासोबतही तसाच प्रकरा घडला.

डेहराडून शहरामध्ये ही घटना घडली आहे. जास्तीच्या दराने दारुविक्री करणाऱ्या दुकानदाराचा भांडाफोड जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाधिकारी सविन बन्सल हे स्वतः सोबत स्टाफ न घेता दुकानात गेले होते. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे.

जिल्हाधिकारी बन्सल हे एका सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहिले आणि दारुची बाटली खरेदी केली. त्यांनी McDowell's ची बाटली घेतली. त्या बाटचीली किंमत ६६० रुपये होती. परंतु त्यांच्याकडून ६८० रुपये उकळण्यात आले.

ही घटना जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर शहरातल्या दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तातडीने कारवाईची पावलं उचलण्यात आली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी हरी गिरी यांनी चुना भट्टा या ठिकाणी असेलल्या दारु दुकानावर छापा मारला. येथे जास्तीच्या दराने दारु विक्री आणि इतर अनियमितता आढळून आल्या. एका ग्राहकाला २०० रुपयांची बिअरची बाटली २१० रुपयांना विक्री केल्याचं निदर्शनास आलं.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुकानातल्या मॅनेजरने लिखित स्वरुपात चूक झाल्याची कबुली दिली असून यापुढे असे प्रकार होणार नाही, असं म्हटलंय. दुकानामध्ये रेट कार्ड योग्य ठिकाणी डकवलेलं नव्हतं, हेही तपासणीमध्ये लक्षात आलं.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत ओल्ड मसुरी रोडवरील दुकानाला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला, चुना भट्टा येथील दुकानावर ७५ हजार रुपयांचा दंड, सर्वे चौक ७५ हजार आणि जाखन येथील ठेक्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT