Mahadev App sakal
देश

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’चा पैसा दिल्लीतील नेत्यांपर्यंत

छत्तीसगडमध्ये गाजत असलेल्या महादेव अ‍ॅपवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये गाजत असलेल्या महादेव अ‍ॅपवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. महादेव अ‍ॅपमधून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना मिळत असलेल्या रक्कमेचा काही हिस्सा दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे जात होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

छत्तीसगडमधील मुंगली येथील जाहीरसभेत बोलताना काँग्रेसवर महादेव अ‍ॅप व इतर मुद्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. छत्तीसगडमध्ये डबल इंजिनचे सरकार नसल्याने अनेक योजनांचा फायदा छत्तीसगडच्या नागरिकांना मिळत नाही.

बघेल सरकारने केंद्र सरकारच्या अनेक योजना लागू केल्या नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधानांनी मात्र आज बहुचर्चित महादेव अ‍ॅपवरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. महादेव अ‍ॅपच्या मालकाकडून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप केला जात आहे. यावरून अनेकांची चौकशी सुरू आहे.

महादेव अ‍ॅपचा पैसा दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना या पैशातील काही हिस्सा पाठविला जात होता. यावेळी पंतप्रधान यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे अंगुलनिर्देश केला आहे. महादेव अॅप प्रकरणी आतापर्यंत कुणीही दिल्लीतील कनेक्शनवर चर्चा केली नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी थेट गांधी कुटुंबाकडे या अ‍ॅपच्या काळ्या पैशाचे कनेक्शन दाखविला आहे.

ते पुन्हा येणार नाही: बघेल

पंतप्रधान मोदी यांच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान छत्तीसगडमध्ये येत आहे. निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा छत्तीसगडमध्ये दिसणार नाही. निवडणूक संपली की त्यांचे छत्तीसगडशी नाते संपून जाईल.

राज्याच्या संकटाच्या काळात ते आले होते का, कोरोनाच्या काळात ते आले होते का, असे प्रश्न विचारून मुख्यमंत्री बघेल यांनी पंतप्रधान केवळ निवडणुकीसाठी त्या त्या राज्यात फिरतात. त्यानंतर ते पुन्हा फिरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी १५ हजार रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT