देश

महंत नरेंद्र गिरींनी मृत्यू आधी शूट केलेला व्हिडिओ; 6 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

महंत गिरी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गनरचीसुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून प्राथमिक तपासत आत्महत्या असल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य निर्भय द्विवेदी यांनी अशी माहिती दिली की, महंत गिरी यांनी सुसाइड नोटशिवाय एक व्हिडिओसुद्धा केला होता. त्यांच्या फोनवर त्यांनी व्हिडिओ शूट केला होता.

निर्भय द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत ज्याचा सुसाइड नोटमध्ये थोडक्यात उल्लेख आहे. हा व्हिडिओ पोलिसांकडे असल्याचं म्हटलं जात आहे.

महंत गिरी यांच्या सुसाइड नोटवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल शिष्य निर्भय द्विवेदी यांनी सांगितलं की, महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी खोलीची तपासणी केली तेव्हा तिथं एक सुसाइड नोटसुद्धा आढळली. ही सुसाइड नोट ७ पानांची होती.

महंत गिरी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी चौकशीसाठी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्व लोकांची चौकशी सुरु असून महंत नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षा रक्षकाचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे. महंत नरेंद्र गिरी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.

प्रयागराजमधील बाघंबरी गादीचे महंत आचार्य नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आश्रमात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती. यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी त्यांचा शिष्य आनंद गिरी याला ताब्यात घेतलं होतं. सुसाइड नोटमध्ये आनंद गिरी याने छळल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कॉल रेकॉर्ड तपासले असून महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT