Swara Bhaskar
Swara Bhaskar esakal
देश

Swara Bhaskar : स्वरा हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार असेल तर...; अयोध्येतील महंतांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

Mahant Raju Das on Swara Bhaskar Marriage : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमद याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर डावे आणि उजवे दोन्ही बाजूंनी उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

अयोध्या येथील महंत राजू दास यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. ते म्हणाले की, जर स्वरा भास्कर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार असेल तर तिला ह्या लग्नाच्या शुभेच्छा.

महंत राजू दास यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला अल्टिमेटम दिला आहे. स्वराने अशा समाजात लग्न केलंय जिथे महिलांना इतर मर्दांसोबत रात्र घालवावी लागते. राजू दास हे अयोध्येतील हनुमानगढी मंदिरातील महंत आहेत.

महंत म्हणाले की, स्वरा भास्कर स्पष्टपणे भारत तुझे तुकडे होतील, अशा गोष्टी करते. दहा दिवसांपूर्वी तिने फहदला भाऊ म्हणून संबोधत, त्याने लवकरात लवकर एखादी मुलगी बघून लग्न करावं, असं म्हटलं होतं. मात्र तिनेच त्याच्याशी लग्न केलं.

महंत पुढे म्हणाले की, स्वरा भास्करलाही खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मी तिला अल्टिमेटम देतो की, तिथे बहिणीसोबत लग्न करतात आणि तीन वेळा तलाख म्हणून अनेक पुरुषांसोबत रात्र घालवावी लागते. जर तिला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवावी वाटत असेल तर तिला हे लग्न मुबारक असो.

परंतु ती खरंच एक नारीशक्ती आहे तर तिने हे लग्न टाळलं पाहिजे होतं. परंतु आता तिने लग्न केलंच आहे तर तिचं स्वागत आहे, कारण सनातनवरुन एक ओझं कमी झालं. अशा शब्दांमध्ये महंतांनी स्वरावर ताशेरे ओढले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT