देश

Jharkhand Assembly election updates: ''विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबद्दल भाजपला आधीच माहिती होती'', बड्या नेत्याचा दावा

election commission press conference: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मनोज पांडे पुढे म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा एक बाईट आहे. ज्यात ते स्पष्टपणे म्हणताएत की उद्या निवडणुकीची घोषणा होईल. हे आश्चर्यकारक आहे. अशा पद्धतीने कोणत्या आयोगाला बोटांच्या इशाऱ्यावर नाचवणं योग्य नाही.

संतोष कानडे

vidhan sabha election 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून त्यातच आचारसंहितेची घोषणा केली जाणार आहे.

भाजपला आचारसंहितेबद्दल आधीच माहिती होती, असा दावा जेएमएम नेते मनोज पांडे यांनी केला आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून जरी आज घोषणा होत असली तरी भाजपच्या नेत्यांना याबद्दल कालच माहिती होती. ही अतिशय गंभीर आणि खेदाची बाब आहे. भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर आयोग काम करत असल्याचं दिसून येतंय.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मनोज पांडे पुढे म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा एक बाईट आहे. ज्यात ते स्पष्टपणे म्हणताएत की उद्या निवडणुकीची घोषणा होईल. हे आश्चर्यकारक आहे. अशा पद्धतीने कोणत्या आयोगाला बोटांच्या इशाऱ्यावर नाचवणं योग्य नाही.

झारखंड मुक्ती मोर्चाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यत आलेली आहे. ज्यात दावा केलाय की, भाजपच्या निवडणूक प्रभारींनी एक दिवस आधीच मंगळवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, असं सांगितलं होतं आणि असंच झालं. त्यांच्या म्हणण्यानुसार ठीक त्याचवेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होत आहे. झारखंडच्या निवडणुका एक महिना अगोदर लावण्यात येत आहेत, असा दावा झारखंड मुक्ती मोर्चाने केला आहे.

दुसरीकडे झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनीही झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तुम्हाला महाराष्ट्रासोबत झारखंडच्या निवडणुका घ्यायच्या आहेत पण हरियाणामध्ये ३ नोव्हेंबरला आणि महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपत होता. मग या राज्यांच्या निवडणुका एकत्र का घेतल्या नाहीत? अशा पद्धतीने राजकीय हेतूने प्रेरित होऊन घोषणा करणं चुकीचं असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. महत्त्वाचं म्हणजे प्रघाताप्रमाणे आचारसंहितादेखील लगेच लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT