Maharashtra Karnataka Dispute Esakal
देश

Maharashtra Karnataka Dispute: सीमाप्रश्नी तोडगा निघणार? आज दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आज दिल्लीत

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर आज सीमाप्रश्नी तोडगा निघणार का? हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या काही गावांवर दावा सांगितला त्यानंतर हा वाद वाढला. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये बैठकीतून काय निष्कर्ष निघेल याकडे दोन्ही राज्यांचं आज लक्ष असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी 10 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचेही या खासदारांनी सांगितले होते. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती. अमित शाह येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT