Maharashtra honored with three National Water Awards Malkapur Satara Kadegaon in Jalna ndian Jain Association  sakal
देश

National Water Award : महाराष्ट्राचा तीन राष्ट्रीय जल पुरस्कारांनी गौरव

साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगावसह भारतीय जैन संघटनेचाही सन्मान

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, केंद्रीय सचिव पंकजकुमार आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार या प्रकारात जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला तिसरा पुरस्कार मिळाला. सरपंच दत्तू निंबाळकर यांनी तो स्वीकारला. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यामधील मलकापूर नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थान‍िक संस्था या प्रकारात तिसरा पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नगराध्यक्ष नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती मनोहर शिंदे यांनी तो स्वीकारला.

‘स्वयंसेवी संस्था’मधून ‘बीजेएस’चा गौरव

स्वयंसेवी सामाजिक संस्था या प्रकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतिलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT