CORONA 
देश

भारतात दिवसभरात 41 हजार 831 नवे रुग्ण; 541 जणांचा मृत्यू

कार्तिक पुजारी

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून 40 हजारांच्या आजपास आढळत आहे. भारतात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचिंत वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात 41 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून 40 हजारांच्या आजपास आढळत आहे. भारतात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचिंत वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात 41 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात एका दिवशी 41 हजार 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 541 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 4 लाख 24 हजार 351 इतकी झाली आहे. (maharashtra india corona uodate today health ministry icmr)

भारतात सध्या कोरोनाचे 4 लाख 10 हजार 952 रुग्ण आहेत. ही संख्या एकूण कोरोना संख्येच्या 1.29 टक्के आहे. देशातील सध्याचा मृत्यूदर 1.34 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशातील 39 हजार 258 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 3 कोटी 08 लाख 20 हजार 521 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 97.37 टक्के झाला आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आईसीएमआरच्या माहितीनुसार, एका दिवसात देशात 17 लाख 89 हजार 472 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण 46 कोटी 82 लाख 16 हजार 510 कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. विषाणूवर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. आतापर्यंत देशातील 47.02 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात एका दिवसात 6 हजार 959 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63 लाख 03 हजार 715 झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 76 हजार 755 इतकी झाली. राज्यात 225 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 32 हजार 791 वर पोहोचला आहे. दिवसभरात 7 हजार 467 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60 लाख 90 हजार 786 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

SCROLL FOR NEXT