Karnataka Flag  Sakal
देश

Maharashtra-Karnataka Issue : भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा? जाणून घ्या नेमकं प्रकरण

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra-Karnataka Issue : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे. नुकतेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला आता नव्याने सुरुवात झाली आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा आहे. नुकताच हा झेंडा जत तालुक्यात काही जण हातात घेऊन फिरताना दिसून आले होते. आज आपण भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा का? आणि कसा याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आपल्या भारताची खासियतही विविधतेतली एकता आहे. असं असलं तरी सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा या एकतेला धक्का पोहचवणारा आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या दिवसापासून आम्ही जत तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवू असं म्हटलं, तेव्हापासून जतवासियांनी “आपदा में अवसर” या म्हणीचा चांगलाच प्रत्यय दिलाय.

कारण कानडी लोकांनी जत तालुक्यातील काही गावांमध्ये येऊन कर्नाटकचा झेंडा फडकवला. तेव्हा प्रश्न पडला कर्नाटकचा वेगळा झेंडा नेमका कसा आहे? का कर्नाटकला वेगळा झेंडा देण्यात आलाय? पण महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना नाही. कर्नाटकाचा झेंडा पिवळा आणि लाल रंगाचा आहे. ज्यात “सत्यमेव जयते” लिहून कर्नाटक राज्याचं चिन्ह दाखवण्यात आले आहे.

यातील रंग प्राचीन संस्कृती आणि हळद-कुंकवाच्या रंगाचे प्रतिक असल्याचे कर्नाटकातील लोक मानतात. त्यात जत तालुक्यात हा झेंडा काही नागरिकांच्या हातात दिसून आल्याने नेमका हा झेंडा कानडी लोकांना एकत्र आणण्यासाठी आहे की, महाराष्ट्राविषयी लोकांच्या भावना पेटवण्यासाठी हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

झेंड्याचा वाद कधी पेटला?

2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न शिगेला पोहचला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या भगव्याला टक्कर म्हणून कर्नाटकाचा झेंडा ऑफिशियल असावा अशी मागणी कानडी लोकांकडून करण्यात आली. त्यानंतर कानडी लोकांची वेगळी ओळख दर्शवण्यासाठी नवा झेंडा उदयास आला. त्यात नुकताच काही जण हा झेंडा घेऊन जतमध्ये दिसून आल्याने कर्नाटक सरकार याचा राजकीय वापर करत असल्याचे आधोरेखित झाले आहे. त्यात असे करण्यामागे कर्नाटक सरकारचा पाठिंबा असल्यानेच काही लोकांनी महाराष्ट्राती जतमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवण्याची हिंमत दाखवली आहे.

कर्नाटकच्या झेंड्याला अधिकृत मान्यता नाही

दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित असताना काही नागरिक कर्नाटकचा हा झेंडा हातात घेऊन फिरताना दिसून येत आहे. मात्र, वेगळ्या पद्धतीने फडकवल्या जाणाऱ्या या झेंड्याला अद्यापपर्यंत भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. एखाद्या राज्याच्या वेगळ्या झेंड्याला परवानगी दिल्यास देशाच्या एकतेला धोका पोहचू शकतो असे केंद्राला वाटते. त्यामुळेच अद्यापर्यंत कानडी लोकं हातात घेऊन फिरणाऱ्या वेगळ्या झेंड्याला अद्यपपर्यंत अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT