coromandel express accident sakal
देश

Marathi Update : देश, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या एका क्लिकवर वाचा

सकाळ डिजिटल टीम

बालासोर रेल्वे अपघात मृतांची संख्या 290 वर, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

बालासोर (ओडिशा) रेल्वे अपघात कटकमधील एससीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 17 वर्षीय अपघातग्रस्त प्रकाश राम यांचा आज सकाळी 7:20 च्या सुमारास मृत्यू झाला. अपघातात आता मृतांची संख्या 290 झाली आहे

गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात मुसळधार पाऊस

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आदेश न्यायालयाने ठेवला राखून

वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.

आरोपी मनोज सानेला 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे न्यायालयाने आरोपी मनोज सानेला 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर परिसरात करण्यात आले आहे. त्यासाठी फडणवीस तुळाजापूरात आहेत, यावेळी त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले.

कर्नाटकात सत्तांतरानंतर वीर सावरकर, गोळवळकर यांच्यासंबंधीचे धडे अभ्यासक्रमातून वगळले!

सत्ता येताच काँग्रेसने भाजप सरकारचे निर्णय बदलण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री सिध्दरमय्या यांनी स्वतंत्र्यवीर सावरकर, संघाचे संस्थापक हेडगेवार आणि गोळवळकर यांच्याविषयीचे शालेय अभ्यासक्रमातील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमात सुधारणा करण्याबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तिरुपती मंदिराजवळील बाजारात भीषण आग!

तिरुपती मंदिराजवळील बाजारात एका इमारतीला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यााठी प्रयत्न सुरू आहेत. येथे मोठ्या संख्यने भाविक येत असतात.

मुंबईतील शाळेत आजान लावल्याने वाद

मुंबईतील कपोल विद्यानिधी शाळेत आजान लावल्याने नवा वाद पेटला आहे. याला पालकांकडून जोरदार विरोध झाल्यानंतर नंतर शाळेने माफी मागितली आहे.

दरम्यान शाळा प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून त्यांच्याकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर शाळेकडून अजानबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आणि आक्रमक झालेल्या पालकांना शाळेने आम्ही सर्व धर्मांच्या प्रर्थना लावतो असं सांगितलं.

कुपवाड्यात नियंत्रण रेषेवरील चकमकीत ५ दहशतवादी ठार; शोध मोहीम सुरूच

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील एलओसीच्या जुमागुंड भागात झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. या भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पंतप्रधान मोदी 20 ते 25 जून दरम्यान अमेरिका, इजिप्त दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 25 जून दरम्यान अमेरिका आणि इजिप्तला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान यूएसएला अधिकृत भेट देतील. या दौऱ्याची सुरुवात न्यूयॉर्कमध्ये होईल, जिथे पंतप्रधान 21 जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील, पंतप्रधान कार्यालयाने याबद्दल माहिती दिली आहे.

मांजरी-हडपसर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी 

मांजरी, हडपसर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची लांबलचक रांग लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी घाईने कामावर निघालेल्या नागरिकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

"हे ओझं फार काळ वाहू शकत नाही, CM शिंदेना हायकमांडची स्पष्ट सूचना"

"कृषि खात्यात सुरू असलेला भ्रष्टाचार पाहिला की मला राज्यातील कृषि क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची दया येते. बोगस धाडींच प्रकरण कोट्यवधी रुपयांचं आहे. या प्रकरणात त्यांचेच लोकं आहेत. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी पावले उचलायला हवेत. मुख्यमंत्री काही करू शकत नाहीत. मुख्यमंत्री हे या आमदारांचेच मिंधे आहेत" असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "चार मंत्री ज्यांना मंत्रिमंडळातून वगळा असं सांगण्यात आलं आहे, त्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव आहे. हे जे दिल्लीतून सांगण्यात आलं ते यासाठीच, या चार किंवा पाच मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिष्ठा धुळीला मिळते आणि हे ओझं फार काळ वाहू शकत नाही अशा स्पष्ट सुचना शिंदेच्या दिल्लीतील हाय कमांडणे त्यांना दिल्या आहेत"

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT