देश

Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Sandip Kapde

केसीआर यांना ओवेसींची भीती वाटते- अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, केसीआर यांनी नेहमीच हैदराबाद मुक्ति दिन साजरा करणे टाळले कारण त्यांना असदुद्दीन ओवेसींची भीती वाटत होती.

विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे- नामदेवराव जाधव

लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार कार्यक्रमाला परवानगी नाकारली तर आपण पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये राहतो का असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांना विचारेन भांडारकरला पण जाईल मी परवानगी साठी पत्र दिले होते. त्यामुळे मी पोलिसांना विचारेन का परवानगी नाकारली. जर मी कागद घेऊन पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे, विचारांची लढाई आहे विचाराने लढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नामदेवराव जाधव यांनी दिलीय.

सुपारी घेणाऱ्यांबद्दल मी काही बोलणार नाही- भुजबळ

अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, सुपारी घेणाऱ्यांबद्दल मी काहीही बोलणार नाही. नेमकं ओबीसींचा लढा सुरु असताना असे आरोप केले जात आहेत.

गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांना आनंद झाला असता- आदित्य ठाकरे

मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना, बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता. ब्रिजचं काम एवढं लेट का झालं? कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट का केलं नाही? आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हा दाखल करतात. कॉन्ट्रॅक्टर मेव जयते म्हणणारे सरकार आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

70 वर्षात झालेलं नुकसान भरुन काढणार - मनोज जरांगे

मनोज जरांगे आज साताऱ्यात सभा घेत आहे. यावेळी त्यांनी ७० वर्षात झालेलं नुकसान भरुन काढतो, असा इशारा दिला.

पुण्यात विश्वचषकासाठी ग्रामदेवतेची महाआरती

पुण्यात विश्वचषकासाठी ग्रामदेवतेची महाआरती करण्यात आली. भारताने विश्वचषक जिंकावा म्हणून पुण्यात ग्रामदेवता कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले. भारताच्या विजयासाठी पुण्यात कसबा गणपतीला काँग्रेसकडून महाआरती करण्यात आली.

टीम इंडियाची जर्सी घालत काँग्रेस कार्यकर्ते कसबा गणपतीच्या आरतीला गेले होते. लहान मुलांच्या हस्ते  कसबा गणपतीला आरती करण्यात आली. इंडिया जीतेगा म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कसबा गणपती बाहेर घोषणाबाजी देखील केली. 

ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना

ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना झालं आहे. धनगर आणि मराठा आरक्षणावर हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार आहे.

राष्ट्रपतींना भेटायला गेलेले शिष्टमंडळ -

1) विनायक राऊत

2) अरविंद सावंत

3) राजन विचारे

4) बंडू जाधव

5) ओमराजे निंबाळकर

6) संजय राऊत

7) प्रियंका चतुर्वेदी

8) अंबादास दानवे

9) सुनील प्रभू

10) अजय चौधरी

11) अनिल परब

विजय वडेट्टीवारांनी घेतली शरद पवार पवारांची भेट

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांची बारामतीतल्या निवासस्थानी भेट घेतली

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 75.08 टक्के तर मध्य प्रदेश 76.22% टक्के  मतदान

छत्तीसगड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 5.08% आणि मध्य प्रदेश निवडणुकीत काल 76.22% मतदान झाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली CM शिंदेंची भेट 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू

झारखंडमधील गिरिडीहमधील बागमारा येथे कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका लग्न समारंभाला उपस्थित राहून ते परतत होते.

ठाकरे गटाचे शिष्टमंडळ ११ वाजता राष्ट्रपतींना भेटणार

मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट; ५ जण जखमी

मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५ जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी नेत्यांचा मेळावा झाला. त्यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. त्यामुळे मराठा-ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस आज बारामती दौऱ्यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT