Dhananjay Munde 
देश

LIVE Update : धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना फ्रँक्चर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना फ्रँक्चर

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडे किरकोळ जखमी झाले असं सांगण्यात आलं होतं मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची ब्रीच कँडी रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. त्यांनी सांगितलं की "धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे”

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवली; रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी सोनिया यांच्यासोबत मुलगी प्रियांका गांधी देखील उपस्थित असून, सोनिया गांधींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे, तर, पीटीआयच्या सूत्रांनी सोनिया गांधींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील बागपत येथील मावी कलान येथून सकाळी सहा वाजता सुरू झाली. मात्र, यात प्रियांका गांधी यात सहभागी झाल्या नाहीत.

एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकांची जबाबदारी दिली ‘या’ सहा नेत्यांवर

शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज मुंबईतील मंत्रालया समोरील बाळासाहेब भवनात बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकांचे काही निर्णय घेण्यात आले. दरम्यान खासदार गजानन कीर्तिकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, आशा मामीडी, कामिनी शेवाळे या सहा नेत्यांवर निवडणुकांची  जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आमदार धनंजय मुंडे यांना एअर ऑम्ब्युलन्सने केलं मुंबईत दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना एअर ऑम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं आहे. त्याच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात होणार उपचार होणार आहेत. धनंजय मुंडे हे परळीकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यांच्या छातीला मार लागला असल्याचे त्यांनी पोस्ट करत सांगितलं होतं.

दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर 1800 सैन्य जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात

राजौरी जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल अतिरिक्त 18 कंपन्या (1800 सैन्य) जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवणार आहेत. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात कर्मचारी तैनात केले जातील.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ मुंबईमध्ये दाखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ते उद्योगपतीना भेटण्यासाठी मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईमध्ये २३ व्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट; एकाचा मृत्यू, अनेक जन अडकल्याची भिती

मुंबईमध्ये २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जन अडकल्याची भिती व्याक्त केली जात आहे.

अखेर महावितरणचा संप मागे, अधिकृत घोषणा

राज्य सरकारला कोणत्याही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. राज्य सरकारला तिन्ही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तीन ते चार मुद्यांवर सकारत्मक चर्चा झाली. वीज कंपन्यांमध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. वीज कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.


RPI कवाडे गट आणि शिंदे गटाची आघाडी

RPI कवाडे गट आणि शिंदे गटाची आघाडी करण्याची घोषणा केली आहे. कवाडे गटाने मविआ मधून कडीमोड घेत नवा संसार थाटला आहे.

मी कधीही चुकीचं बोललो नाही; अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम

मी कधीही चुकीचं बोललो नाही; अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून आलं आहे. मी कधीही कोणाचा अपमान केला नाही. मी कोणत्याही स्त्रीला कधी काही बोललो नाही. मी कधी कोणत्या महापुरुषांचा अपमान केला नाही.

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच बेळगाव, कारवार, निपाणीच्या घोषणा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील गावांचा विषय बराच ऐरणीवर आला आहे. याचे पडसाद मुंबईत सुरु असलेल्या विश्व साहित्य संमेलनातही पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना सभागृहात बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यामुळं क्षणभर भाषण थांबवून मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्यही केलं. मुख्यमंत्री म्हणाले, यासाठी सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेलो होतो. यावेळी गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा या विषयावर हस्तक्षेप केला, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.

नितेश राणे आक्रमक! आव्हाडांना दिली हिंदू मंदिरांची यादी

Nitesh Rane : विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. यात आणखी भर पडली ती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे. आव्हाड यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याला जोडून एक वक्तव्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आली असून सत्ताधारी टीका करत आहेत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले, "मुंब्रारक्षक जितेंद्र आव्हाडजी आपण औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?, असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे 'धर्मवीर' नाहीत असे घोषीत करतो."

'मराठी तितुका मेळवावा' मराठी संमेलनाचं फडणविसांच्या हस्ते उद्घाटन 

'मराठी तितुका मेळवावा' मराठी संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे. भारताला जी २० च अध्यपद मिळालं. मराठी भाषा समृद्ध करण्यात सावरकरांच योगदान. सर्व प्रकारचे शिक्षण मराठी भाषेत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सावरकरांनी हजारो शब्द मराठीला दिले. तसेच मराठीला ज्ञान भाषा करण्याचा प्रयत्नही करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारकडून मेस्मा कायदा लागू

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती (अंदाजे 30 युनियन्स) यांनी दिलेल्या संपाच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 2017 मधील (मेस्मा) तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारने महावितरणला निर्देश दिले आहेत.

पुण्यात रस्त्यावरील सिग्नल बंद

पुण्यातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा मोठा परिणाम पुण्यात पाहायला मिळत आहे. पुण्यातील माणिकबाग, शिवणे-उत्तमनगर सह काही भागात मध्यरात्रीपासून बत्ती गुल झाली होती. पिंपरी परिसरातही वीजपुरवठा विस्कळीत होता. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) आनंदनगर, सनसिटी परिसरात पहाटे साडेतीनपासून वीज पुरवठा खंडित आहे. तर धायरी परिसरात काही भागात आणि कात्रज, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, कसबा पेठ परिसरातही वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कोयना धरणाचा पायथा वीजगृह पडला बंद

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला आहे. पायथा गृहातून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली असून वीज निर्मितीनंतर सिंचनासाठी सोडले जाणारे पाणीही बंद झाले आहे. सिंचनासाठी गरज भासल्यास बुधवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.

आझम खान यांच्यावरील खटले उत्तर प्रदेशातून दुसर्‍या राज्यात हस्तांतरित करण्यात न्यायालयाचा नकार 

सुप्रीम कोर्टाने सपा नेते आझम खान यांच्यावरील काही खटले उत्तर प्रदेशातून दुसर्‍या राज्यात हस्तांतरित करण्याची विनंती करणारी याचिका स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने आझम खान यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आणि त्यांची याचिका जलदगतीने स्वीकारली जावी असे निर्देश दिले.

महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुकारला संप

वीज खंडित झालेले शहरातील काही भाग:

कसबा पेठ

टिंगरे नगर, विश्रांतवाडी

शिवणे

उत्तमनगर

कोंढवे धावडे

कात्रज

धायरी

हडपसर

बेकराई नगर

सिंहगड रोड वरील आनंदनगर

धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात

राष्ट्रावडीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत छोटासा अपघात झाला आहे. वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.

केसरकर २०२३ ला तुरुंगात जाणार; राऊतांचा दावा

आम्ही पळपुटे नाहीत. राज्यपालांनी माफी मागावी असं राज्यसरकार का सांगत नाही.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

१० वर्षांच्या भावाने शतक ठोकताच श्रीलंकेतून वैभव सूर्यवंशीची मोठी प्रतिक्रिया; इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला...

पेंच व्याघ्र प्रकल्पात AI आधारित 'टायगर अलार्म सिस्टम'; वाघ येण्याआधी सायरन वाजणार; नेमकी यंत्रणा काय?

Latest Marathi News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

आणखी एका मराठी अभिनेत्रीची 'धमाल ४' मध्ये एंट्री; करणार अजय देवगनसोबत काम, भूत बनलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT