live Updates news in marathi esakal
देश

Latest Marathi News Updates : धोत्रे खून प्रकरणात उद्धव निमसेंना २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Breaking Marathi News live Updates 16 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सूरज यादव

Nashik Live: धोत्रे खून प्रकरणात उद्धव निमसेंना २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

संशयित आरोपी उद्धव निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. नाशिक पोलिसांनी उद्धव निमसेंना नाशिक न्यायालयात आज हजर केले. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणात उद्धव निमसे फरार होते. निमसे यांच्यासह बारा ते तेरा जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. २२ ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, तर २९ ऑगस्टला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तब्बल वीस दिवस भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार होते. मोबाईल न बाळगता चार ते पाच राज्यात निमसे यांनी ट्रॅव्हल बसने प्रवास केला. पोलिसांना थांगपत्ता लागू नये म्हणून निमसे यांनी हॉटेलमध्ये मुक्काम करणेही टाळले होते. काल निमसे पोलिसांना शरण आल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

Beed Live : मनोज जरांगे पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर

काल बीड जिल्ह्यामध्ये झाला, धुवाधार पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त भागांची मनोज जरांगे पाहणी करणार आहेत.

आष्टी कडा व शिरूर भागामध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या भागाची पाहणी करणार आहेत. अंतरवाली सराटी मधून मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Nashik Live : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले.

नाशिकच्या उमराणे येथील रामेश्वर कृषी या खाजगी बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त होत त्यांनी देवळा-मालेगाव रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले.

कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत असून भाव घसरल्याने शेतकऱ्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती,दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहचत त्यांनी आंदोलन कर्त्यांची समजूत काढली.

Live : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

प्रत्येक निवडणुकीत प्रामुख्याने गाजलेल्या शहादा तालुक्यातील रहाटयावड धरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असून सद्यस्थितीत गेल्या आठ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे.

या धरणामुळे जवळपासच्या 15 गावांना पाणीटंचाईचा समस्येपासून मुक्तता होणार आहे...

मात्र एकदा मागणी करूनही धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'केआर मिरर' केआरसीएल मोबाइल ॲप सुरू केले आहे. हे ॲप मराठीसह चार भाषांत कार्यान्वित असून यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वे गाड्यांची स्थिती समजू शकणार आहे. तसेच प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.

Railway Ticket Booking: ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

भारतीय रेल्वेने सामान्य आरक्षण तिकिटे ऑनलाइन बुक करण्याच्या पद्धतीत मोठा बदल आणला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून, आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या पहिल्या १५ मिनिटांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. म्हणजेच तिकीट बुकिंग सुरू होताच सामान्य तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाला बुकींग प्रक्रियेत पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्यांची ओळख पडताळणी करावी लागणार आहे.

Mumbai Live: परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

मुंबईला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई पावसाच्या आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता १४,३०,३४५ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८.८२ टक्के आहे.

RBI New Guidelines: फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांची सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी आरबीआयने आजपासून पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यात कठोर पात्रता, विवाद निराकरण धोरण आणि आर्थिक स्थिरता आवश्यकतांचा समावेश आहे.

Mumbai Live: मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी मुंबई आणि त्याच्या उपनगरात ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसा विजांसह गडगडाटी वादळे येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला असून विजांसह गडगडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Beed Live : बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

बीडच्या शृंगारवाडी येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमचे ११ सुशिक्षित क्वालिफाईड मुलं आहेत. तुमच्या अकरा मुलींचा विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य केल्यानंतर बीडच्या तलवाडा मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Jalna Live : जालन्यात दोन गटात हाणामारी, अर्जून खोतकऱ्यांच्या दौऱ्यावेळी घडला प्रकार

जालन्यात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडला आहे अर्जून खोतकऱ्यांच्या दौऱ्यावेळी हा प्रकार घडला.

Mumbai Live  : अर्थखात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, नाही तर आम्ही काळी पत्रिकाचा जाहीर करू - नाना पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची भरपाईबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तिजोरी लुलण्याचं काम सुरु असल्याचे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, असेही ते म्हणाले. तसेच अर्थखात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, नाही तर आम्ही काळी पत्रिकाचा जाहीर करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

Jalgaon Live : पुरामुळे जळगाव- जामनेर वाहतूक ठप्प

जामनेर जळगाव रोड वरील चिंचखेडा बुद्रुक येथील खडकी नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने जळगाव जामनेर वाहतूक ठप्प झाली असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

Mumbai Live : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी  घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान ही भेट कशासाठी होती याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Vidarbha News Updates : विदर्भात ८ महिन्यात २९६ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

विदर्भात नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचं चित्र दिसून येतंय. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या झाल्या. तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधीही वितरीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News Live Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Beed Heavy Rain : बीडमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT