भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्या वाढ होत आहे. मध्यप्रदेशामधुन येणाऱ्या तापी नदी क्षेत्रात पर्जन्यमापन मागील 24 तासात हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्या नुसार धरणात दुपारपासुन पाणी पातळीत वाढ होत असल्याने २२ दरवाजे एक मीटरने उघडून तापी नदीपात्रात ४२६६१ क्युसेस विसर्ग होत आहे धरणातील एकुण पाणीसाठा ५७.११ टक्के प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे.नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहणेबाबत हतनूर प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.
केंद्रीय जलजीवन मिशन चे म़ंत्री मा.ना C.R.Patil यांची महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना च्या शिष्टमंडळ द्वारे सुरत मध्ये भेटी दरम्यान महाराष्ट्र शासनास निधी देण्याबाबत विसंगती दिसत आहे. या बाबतीचे निवेदन सुरत येथे जाऊन देण्यात आले यात महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे राज्य पदाधिकारी व संचालक शरद पाटील, शांताराम पाटील ,योगेश पाटील,दिलीप पाटील, जयविर पाटील, अनिल पाटील यांच्या सह असंख्य काॅन्ट्रेक्टर उपस्थित होते.
"हा पूर्णपणे बनाव आहे
रेव्ह पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो
एका फ्लॅट मध्ये ४ जणं एकत्र येतात त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही
२ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे
कुठल्या पदार्थाचे सेवन खेवलकर यांनी केलं नाही
ब्लड सँपल आल्यावर सिद्ध होईल की त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केलं नव्हतं
खेवलकर ज्या हॉटेल मध्ये होते तिथे रेकी करण्यात आली होती. २ वेळा त्यांच्या विरोधात ट्रॅप रचला गेला होता"
खराडी परिसरात एका खासगी रेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन तरुणींसह पाच पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत त्यांच्या कडून कोकेन, गांजा, हुक्का, मद्याच्या बाटल्या जप्त केला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल मनिष खेवलकर ( वय ४१, रा. इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. अमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी), समीर फकीर महमंद सय्यद ( वय ४१, रा. पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, रा. वाघोली), श्रीपाद मोहन यादव ( वय २७, रा. पंचतारा नगर, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग ( वय २२, रा. औध), प्राची गोपाळ शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे देऊन कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शहरात सलग दोन दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे येथील पूर्व भागातील आझादनगर व आयुबनगर भागांमध्ये रस्ते व गल्ल्यांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने या समस्यांचा सामना शहरातील पूर्व भागातील नागरीकांना करावा लागतो. येथील गटारींची गेल्या वर्षभरापासून स्वच्छ केली जात नाही. तसेच गटारीत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा साचलेला असतो. त्यामुळे गटारी बंद होतात. महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे कचरा उचलला जात नसल्याने कचरा गटारीत पडतो. त्यामुळे शहरातील अनेक गटारी तुडुंब भरल्या असून जोरदार पाऊस पडल्यास शहरातील अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असेल. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गटारींची स्वच्छता करावी. येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरीकांना ये - जा करावी लागत होती. बहुसंख्य वाहने पाण्यात बंद पडत असल्याने रिक्षाचालक व नागरिकांची तारांबळ उडाली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चेन्नई येथील सिद्धांत ग्रुपद्वारे तयार केलेल्या 'सिद्धांत शिक्षण अभ्यासक्रम सूची'चे प्रकाशन केले.
सिद्धांतचे संस्थापक जयकिशन झवेर यांनी सिद्धांतच्या व्हिजन डॉक्युमेंट'ची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत 'स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर'ची पाहणी केली.
यावेळी त्यांनी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली.
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे निफाड येथील नांदूर-मध्यमेश्वर धरणातून काल संध्याकाळपासून 1,775 क्यूसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. आज दुपारी 3 वाजता विसर्गामध्ये वाढ करून आता 19,717 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
साडे तीन वाजता खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोर्टात आणणार
पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणी ७ जण अटकेत
पुणे पोलिसांनी केली डॉ प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना अटक
पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
भारतात पारंपरिक पद्धतीने हाताने सोनं घडवणाऱ्या सुवर्णकारांना धोरणात्मक पाठबळ देण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केले. ते अखिल भारतीय जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशनच्या २०व्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डोंगरकड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे, हिरव्यागार सृष्टीत पसरलेली धुक्याची चादर, आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या वातावरणात भिमा नदीचं उगमस्थान अगदी मंत्रमुग्ध करणारं दृश्य साकारतंय. भोरगिरीच्या डोंगररांगेत असलेल्या भिमानदीच्या उगमस्थानी सध्या निसर्गाचं वैभव डोळ्याचं पारणं फेडणारं ठरतंय.
"भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय," माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात तर स्वपक्षातील आमदारांना देखील दिला घरचा आहेर.
- भुगाव येथील एलोरा वाईन्सच्या मागील रस्त्यावर अचानक झाड कोसळून एक चारचाकी गाडी अडकली होती.
- सुदैवाने, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गाडीत असलेले चारही प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
- एनडीएच्या अग्निशमन जवानांनी तत्काळ चेन सॉ व कुऱ्हाडीच्या साहाय्याने झाड हटवून गाडी बाहेर काढली आणि वाहतूक सुरळीत केली.
- सोलापुरातील रुग्ण मोठ्या संख्येने घेतायत या महाआरोग्य शिबिराचा लाभ
- या महाआरोग्य शिबिरात एक्स रे,रक्त - लघवी तपासणी,क्षय रोग तपासणी,महिलांसाठी गर्भाशायाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येत आहे.
- दरम्यान,या महाआरोग्य शिबिराचा लाभ साधारण एक ते दोन हजार जणांनी घेतलाय.
- हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर महापालिका आरोग्य विभाग,सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डॉ.वैषपायन मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
मागील चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.
त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहेत. गंगाखेड येथील अनेक पुरातन मंदिर पाण्याखाली गेली आहेत.
तर पाणी पातळीत वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
वाढत्या पाणी पातळीवर नजर ठेवली जात आहे अशी माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे
तर कोणीही नदी पात्रामध्ये उतरूनये असे आवाहन करण्यात आले आहे.
नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाटघर, निरा देवघर, गुंजवणी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे
त्यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.
पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी वीर धरणा मधून नीरा नदीच्या पात्रात 14,577 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात वाल्यांना प्रशासनांना नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
निरा खोऱ्यातील धरण साखळीतील भाटघर धरणमधुन 3461 क्युसेक, निरा देवघर धरणामधून 3484 क्युसेक तर गुंजवणी धरणा मधून 250 क्युसेकने वीर धरणात पाणी येत आहे
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच.
परंतु #हनी_ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे.
कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे.
आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहीण योजना आणली.
या लाडक्या बहिणींचे पैसे पुरूषांनी लाटले हे चालणार नाही. त्या पुरूषांना सोडणार नाही.
आमच्या घरी मुली, बहिणी, मातांच्याकरता ही योजना आम्ही आणली. ज्यांच अडिच लाखाच्या आत उत्पन्न आहे. त्यांनी लाभ घ्यावा.
जे नोकरीला आहेत तेच पैसे घेत आहेत. हे असलं चालणार नाही. शेवटी नियमांनी सरकार चालतं.
कायद्यांनी घटनेने संविधानाने परिसर, राज्य आणि देश चालतो. अशा अनेक तक्रारी होतात. त्याच्यात नाहक कोणाला त्रास व्हावा ही अजित पवार किंवा महायुती सरकारची अजिबात धारणा नाही. पण चुकीचे होत असेल तर थांबवलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे.
याकरीता आम्ही लक्ष ठेवून असतोय. मी साडेसात लाख हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे तोही पुरवणी मागण्यांच्या सहीत. यातले ४५ हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात. माझ्या शेतकऱ्यांला साडेसात एचपीचीपर्यंत कृषीपंप चालवणाऱ्या मोफत वीज दिली जात आहे.
वीज माफी माफ म्हणजे तुम्ही जे पैसे भरत होता ते पैसे आता राज्याच्या तिजोरीतून जातात. २० हजार कोटी रूपये ही रक्कम आहे. माझ्या ४५ लाख शेतकऱ्यांना शेतीचे पंपाचे बिल येऊ नये म्हणून मी वीज माफी दिली. असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं करायचं असेल तर कारखानदारी काटकसरीने करावी.
साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्यासाठी शाळा, कॉलेज काढता येतात.
कारखान्यांच्या गोडावूनच्यावर सोलार पॅनेल बसवून साखर कारखान्यांना नफा मिळवून देता येतो.
देशातील साखर कारखाने कशा पद्धतीने चालतात याची सर्व यादी माझ्याकडे आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं करायचं असेल तर कारखानदारी काटकसरीने करावी.
साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्यासाठी शाळा, कॉलेज काढता येतात.
कारखान्यांच्या गोडावूनच्यावर सोलार पॅनेल बसवून साखर कारखान्यांना नफा मिळवून देता येतो.
देशातील साखर कारखाने कशा पद्धतीने चालतात याची सर्व यादी माझ्याकडे आहे.
इचलकरंजीत पंचगंगा नदीवरील जूना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळं पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून जूना पूल दोन्ही बाजूला बॅरिकेडेस लावून बंद करण्यात आला आहे.
कागल, हुपरीकडे जाण्यासाठी नव्या पूलाचा वापर सुरू झाला आहे.
प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असे महाजन म्हणाले आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणे खडसेंच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू. मी घटनास्थळी जात आहे. घटनेचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहे: गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे एएनआयला
उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात आज सकाळी 7 वाजल्यापासून 35000 एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे, नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पाकिस्तान आयएसआय समर्थित सीमापार अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज पैशांच्या तस्करी नेटवर्कमधील ५ प्रमुख आरोपींना अटक केली. केंद्रीय एजन्सींशी जवळून समन्वय साधून, पोलिसांनी २ मॅगझिनसह एके सायगा ३०८ असॉल्ट रायफल, ४ मॅगझिनसह दोन पिस्तूल ९ एमएम, एके रायफलचे ९० जिवंत काडतुसे, १० जिवंत काडतुसे (९ एमएम), ७.५ लाख रुपये रोख, एक कार आणि ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मालाची डिलिव्हरी गँगस्टर जग्गु भगवानपुरियाचा ओळखीचा सहकारी नव पंडोरीला केली जाणार होती: डीजीपी पंजाब पोलिस
वाशिम जिल्ह्यातून अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी सुरू असलेल्या चार पदरी रस्त्याचं काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. या महामार्गावर एका बाजूला ठेकेदाराने खोदलेला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे अशा गंभीर परिस्थितीत वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. यात कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला.
रत्नागिरीत आज मंत्र्यांचे दौरे असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये असणार आहेत. खेडमधील स्व.मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील असणार आहेत. तर रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदराच्या कामाचं भूमीपूजन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित असणार आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. मराठवाड्यालाही पावसानं झोडपलंय. तर कोल्हापूर सांगलीत पावसाची संततधार सुरू असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही धरणांमधून विसर्ग सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.