विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाने कृत्रिम वाळू धोरणाची कार्यपद्धती जाहीर केली आहे.
‘‘साध्या वेशातील पोलिस माझ्या जावयावर पाळत ठेवून होते. पोलिस लगेचच पत्रकार परिषद घेउन माध्यमांना माहिती, व्हिडिओ देतात. पोलिस किंवा सरकार एवढी तत्परता हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रफुल्ल लोढाबाबत का दाखवत नाही? या कारवाईमागे कोणीतरी ‘सूत्रधार’ असून, पोलिसांनी आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसांनी कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर दारू पिऊन वाहन चालविताना नाकाबंदी दरम्यान आढळून आलेल्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना मा.न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचं पाणी अडवलं. मात्र जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा काँग्रेसने पाकिस्तानसोबत व्यापारी करार केले होते, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आसूड ओढला.
मी हे भारताच्या विजयोत्सावचं अधिवेशन असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा विजयोत्सवाची गोष्ट सांगतो तेव्हा दहशतवाद्यांच्या हेडक्वॉर्टरला मातीत घालण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे. भारताच्या सैन्य आणि शौर्याच्या विजयाची गाथा आहे. १४० कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती, त्यांच्या अप्रतिम विजयाची गोष्ट मी सांगत असतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. मी १४० देशवासियांच्या भावनेत आपला स्वर मिसळण्यासाठी मी उभा आहे. १४० कोटी भारतीयांची गुंज सभागृहात घुमत आहे. त्यात मी माझा स्वर मिसळत आहे. मी देशवासियांचं अभिनंदन करत आहे, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.
गणपतीच्या काळात मागच्या 10 वर्ष्यात दारूची कारवाई झालीय.. त्या आरोपीना बोलवा आतापासून परेड करा, एकदोन महिने त्यांना आत टाका… ते दारू कोठून आणतात ते आयडेंटिफाय करा मालकाला बोलवून तंबी द्या….. जर दारू दिसली तर सात पिढ्या दारू विकू शकणार नाही अशी कारवाई करू
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार निदर्शने. आंदोलनात गाढव आणून भाजपकडून प्रणिती शिंदेंविरोधात निदर्शने. – खासदार प्रणिती शिंदे या स्टंटलेडी झालीय, राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी त्या बेताल वक्तव्य करतात
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील समाधान बाराते याचं आमरण उपोषण सुरु आहे. शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्याने तीन एकर जमीन पडुन राहिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडुन दिरंगाई केली जात असल्याचा शेतकऱ्याचा आरोप, जो पर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा
पलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही, हे भारताचं अपयश आहे, असं-राहुल गांधी म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की पाकिस्तानला फोन केला होता. सरकारने पाकिस्तानला प्लॅन सांगितला. सैनिकांना स्वातंत्र्य द्याचचं होतं. पण सरकारने त्यांचे हात बांधले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला फोन का केला. मिलीटरी ऑपरेशनसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, पण ती दिसली नाही, असंही राहुलं गांधी म्हणाले.
पहलगामचा हल्ला पाकिस्तानने केला. आम्ही त्यांचा निषेध केला. राजनाथ सिंह यांनी १९७१ आणि ऑपरेशन सिंदूरची तुलना केली. त्यावेळी राजकीय इच्छा शक्ती होती. यात कोणताही संशय नाही. आम्ही बांगलादेश निर्माण केला. सैन्याने इंदिरा गांधींना सांगितलं की आम्हाला सहा महिने पाहिजे. तेव्हा इंदिरा गांधी यांनी सैन्याला हवा तितका वेळ दिला. एक लाख पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केलं. एक नाव देश निर्माण झाला.
पलगामधील हल्ल्यानंतर मी कर्नालमध्ये एका सैनिकाच्या घरी गेलो, तेव्हा मला असं वाटलं मी माझ्या कुटुंबासोबत आहे. त्यांनी मला त्यांच्या मुलाचे फोटो दाखवलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांबाबत माहिती दिली. मी दोन तास तिथे होते. त्याची बहीण म्हणाली मी दरवाज्याकडे बघते, पण माझा भाऊ आता परत कधी येणार नाही. त्यानंतर उत्तर प्रदेशात मी आणखी एका पीडित कुटुंबियांशी भेटलो पतीला त्यांच्या पत्नीसमोरच गोळी मारण्यात आली. हे ऐकून प्रत्येक भारतीयाला दुखं होतं. जे झालं तो चुकीचं झालं. आम्ही सर्वांनीच यासाठी पाकिस्तानचा निषेध केला, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल आहे, सोयाबीनवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे...
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र ती अमलात आणली नाही..
राज्यामध्ये अन्याय आणि अत्याचाराचे प्रकरण वाढत चालले आहे...
काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे...
कार्यकर्ता आज देखील काँग्रेस पक्षासोबत आहे...
देशभरामध्ये भाजपसोबत संघर्ष करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे...
चंदगड तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी, निराधार व दिव्यांग पेन्शन, अतिवृष्टीची नुकसानभरपाई आणि बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या कामासंदर्भातील मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी चंदगडमध्ये “भीक माग” आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
"काँग्रेस पक्ष हा केवळ नेत्यांचा नव्हे, तर सामान्य कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने आधार असलेला पक्ष आहे," असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
राज्यभरातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर विविध रोगांचे संकट घोंगावत आहे, ज्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र ती प्रत्यक्षात अमलात आणण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
सध्या राज्यात अन्याय आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, जी गंभीर चिंतेची बाब आहे.
आजही काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता पक्षाच्या विचारांशी प्रामाणिकपणे जोडलेला आहे. त्याची निष्ठा आणि संघर्षक्षमता हा पक्षाचा खरी ताकद आहे.
भाजप सरकारच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस असून, देशभरात संघर्षाची धुरा काँग्रेसच समर्थपणे वाहत आहे.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गरुड मंडपाच्या पुनर्रचनेचे काम वेगाने सुरू आहे. या अंतर्गत मंगळवारी ८ लाकडी खांब यशस्वीरित्या उभारण्यात आले. संपूर्ण प्रकल्पात एकूण ४८ लाकडी खांब आणि भव्य कमान उभारण्याचे उद्दिष्ट असून, पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100 हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल
तोडफोड करणाऱ्या 39 जणांची नावे निष्पन्न तर 100 ते 125 अज्ञातांवर देखील गुन्हा दाखल
नांदणीमध्ये झालेल्या तोडफोडी मध्ये 12 पोलीस आणि पोलीस अधिकारी जखमी
राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभूशेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल
पोलिसांच्या सात गाड्यांची जमावाने केली तोडफोड, 1 लाख 50 हजारांचे नुकसान
"माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला नाही यावरून कळतंय की लोकशाही नाही. यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही. उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षातल्या लोक कारवाई करू शकत नाही."- अंजली दमानिया
गंभीर गुन्ह्यांसह परराज्यातून गावठी कट्टे आणून नाशिकमध्ये विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमडी (मॅफेड्रॉन) नामक अमली पदार्थाची विक्री करताना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. साथीदारासह ताब्यात घेतलेल्या दोघांकडून सुमारे एक लाखांचे २९.९ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि कार असा सुमारे सव्वा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमडी ड्रग्जच्या अवैध व्यवसायामध्ये सराईत गुन्हेगारांच्या सहभागाने पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल संदीप सोनवणे (३३, रा. फर्नांडिसवाडी, जयभवानी रोड, नाशिकरोड) या सराईत गुन्हेगारासह केतन पांडुरंग पोले (२५, रा. जाचक मळा, जय भवानी रोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
कल्याण तरुणी मारहाण प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु होती. आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजीत झाच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. पीडित तरुणीने तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगत जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर साधारण रात्री ११ वाजताच्या सुमारास रत्नागिरीमधील हातखंबा येथे पटली झाला होता. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. टँकरमधीस गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला यानंतर सुरळीत वाहतूक सुरू झाली. आज दुपारी सव्वादोनच्या सुमारात पुन्हा वाहतूक सुरू झाली.
देशातील जनतेची जबबादारी सरकारची नाही का? असा प्रश्न उपस्थित करत पहलगाम हल्ल्यावरून प्रियांका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
- करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी पार पडली
- धनंजय मुंडे यांच्या वकिलाची तब्येत खराब असल्यामुळे 16 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
- माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दाखल केले जाणाऱ्या शपथपत्रात पत्नी करुणा मुंडे यांच्या बाबतचा उल्लेख आणि त्यांच्या संपत्ती बाबतचा उल्लेख घडल्याची तक्रार स्वत: करुणा मुंडे यांनी केली होती
- धनंजय मुंडे त्यांच्या वकिलांची तब्येत खराब असल्यामुळे 16 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे
- आज आम्ही न्यायालयासमोर दोन्ही मुलांचे पासपोर्ट दिले आहेत. यामध्ये दोन्ही मुलांचा उल्लेख असून धनंजय मुंडे यांचे देखील उल्लेख आहे .
- न्यायालयाने 16 ऑगस्ट पर्यंत आपले काय म्हणणे आहे ते मांडण्यात यावे त्यानंतर निकाल दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर प्रवीण दरेकर यांची एक हाती सत्ता
- 21 जागांपैकी १९ जागांवर प्रवीण दरेकर यांचा पॅनल विजयी
- दोन जागा विरोधी पक्षाला
मुंबई वेधशाळेने रायगड, रत्नागिरी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर भंडारा हे जिल्हे आणि सातारा व पुणे घाट परिसराला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज नागपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात सुरु झाली आहे. पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून २१ नागरिकांना शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण करण्यासाठी जीवंत नाग पकडण्याची परवानगी मिळाल्याने आज शिराळा येथे जीवंत नाग मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली दाखवून प्रबोधन केले जात आहे.त्यामुळे येणाऱ्या भाविकांना २३ वर्षा नंतर पुन्हा एकवेळा नाग दर्शन झाले आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर असताना मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विक्रोळी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष गणपती बाप्पाला रस्त्यावरील खड्ड्यांचे निरीक्षण करण्यासाठी नेले. खड्ड्यांमधून मिरवणूक काढण्यात आली, बाल्या डान्स आणि गणेश आवाहन याही खड्ड्यांच्या साक्षीने पार पडल्या. यावेळी पालिका आणि सरकारचा निषेध करत खड्डे बुजवण्यासाठी गणपतीकडे सुबुद्धी मागण्यात आली.
गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, २३ एप्रिल रोजी झालेल्या सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) बैठकीत सिंधू पाणी करार (सिंधु जल संधि) थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासोबतच, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठवण्यात आले आणि काही अधिकाऱ्यांना अवांछित व्यक्ती (persona non grata) घोषित करण्यात आले. या बैठकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कल्याण पूर्वेत भाजप पदाधिकाऱ्यांचा रस्ता रोको..
पूर्वेतील पाणी समस्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घरचा आहेर देत सकाळपासून आंदोलन सुरू केले होते
सत्ताधारी भाजपलाच आंदोलन करावे लागत आहे
मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने रस्ता रोको करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यात सहभागी तीन दहशतवादी ठार मारण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी मिळालेल्या माहितीनुसार मोठी कारवाई करत या दहशतवाद्यांचा शोध घेतला आणि चकमकीदरम्यान त्यांचा खात्मा केला.
जपानचे भारतातील राजदूत ओनो केईची यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि केईची यांनी विविध क्षेत्रांतील सहकार्य, तसेच प्रकल्पांचे समन्वय आदी विषयांवर चर्चा केली.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आज गनिमी काव्याने आंदोलन करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेलं आहे. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, निर्यातीसाठी अनुदान, आणि बाजार हस्तक्षेप योजना तातडीने राबवण्याच्या मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन पोहोचले आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दंगा नियंत्रण पथकही प्रवेशद्वारावर सज्ज ठेवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान कोणताही हिंसाचार न करता गनिमी पद्धतीने निषेध नोंदवण्याची रणनीती आखली आहे.
त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीसारखं स्वरूप आलं असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. आंदोलन शांततेत पार पडावं म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शेतकऱ्यांचा रोष आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे नाशिक पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलं आहे.
नाशिक – श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांची मोठी संख्या पाहायला मिळते, मात्र नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांची चांगलीच परीक्षा घेतली जात आहे. रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.
वर्षातून तिनदा रस्त्याची दुरुस्ती करूनही स्थिती जैसे थे आहे. तब्बल ३ कोटी रुपये खर्चूनही रस्ता पुन्हा खड्ड्यांतच असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
एकीकडे विभागाने जबाबदारी कंत्राटदारावर ढकलली आहे, तर दुसरीकडे दंड ठोठावूनही कंत्राटदाराकडून आवश्यक ती दुरुस्ती होत नसल्यामुळे भाविक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या मार्गावरून लाखो भक्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येतात, त्याच मार्गाची अशी दुर्दशा शिवभक्तांच्या नाराजीचं कारण बनत आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू
२८ हजार ६६२ क्युसेक्स कमी करून २४ हजार ७७२ क्यूसेक्स करण्यात येत आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.
४ हजार ८०० कोटींचे राऊंड ट्रिपींग केले आहे का? असेही अशू शकते.
याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, याची चौकशी झालीच पाहिजे असाही दावा खासदार सुळेंनी केला.
महाराष्ट्रातील कष्ट करणाऱ्यांचे पैसे सरकारने कोणाला दिले ही माहिती समोर आलीच पाहिजे. याचे ऑडिट झालेच पाहिजे.
या प्रकरणात ज्याची फायनल सही असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असेही सुळे म्हणाल्या
न्यायालयात आजपासून साक्षी पुराव्याला सुरवात होणार
या आधी राहुल गांधी यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे.
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती.
पुणे न्यायालयात आज राहुल गांधी यांच्या बाजूने मिलिंद पवार मांडणार बाजू
पोलिसांना माझे काही प्रश्न आहेत. संगीत नाही, गोंधळ नाही, रेव्ह पार्टी कसं म्हणतात
पोलिसांना विचारणे आहे की रेव्ह पार्टी म्हणजे काय?
पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून समोर आले, पोलिसांना कुठले अधिकार आहेत?
पोलिसांना चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, यातून बदनामी केली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून ऑपरेश सिंदूरवर आजही चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जालनात जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून घनसावंगीमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने 7 गावांचा संपर्क तुटला आहे.
भारतीय वंशाची नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. ही शिक्षा रद्द झाल्याचे दावे सध्या करण्यात येतायत. पण पीडित तरुणाच्या भावाने शिक्षा रद्द झाली नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारकडूनही हे दावे चुकीचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मोठा धक्का देणार आहे. मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय असलेले कार्यकर्ते राजू साबळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 2 ऑगस्टला माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उपस्थितित हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. साबळे यांच्या सोबत माणगाव नगर पंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले होते. आता गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण अपडेट डॉ प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. ड्रग्स पार्टी प्रकरणी ६ जणांची पोलिस कोठडी आज संपत आहे. ६ जणांच्या पोलिस कोठडी मध्ये वाढ होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुणे पोलिस पोलिस कोठडी मिळण्यासाठी युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. तर आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि जामीन मिळावा अशी बाजू आज आरोपींचे वकील न्यायालयात मांडणार आहेत.
सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना,केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळाकरांना जिवंत नागाचे दर्शन होणार आहे. त्यामुळे शिराळकरांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या 23 वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागांची पूजा करून न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करत होते. मात्र यंदा केंद्र सरकारने शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन होणार आहे. शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.