Maharashtra Live Marathi News Update esakal
देश

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

Breaking Marathi News live Updates 9 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सूरज यादव

Jalgaon News: अमळनेरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

अमळनेर शहरातून ८ रोजी ईद निमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या किरकोळ दगडफेक प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या १० तरुणांना ताब्यात घेतले असून शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अमळनेर शहरात ठाण मांडून बसले आहेत.

C.P. Radhakrishnan Vice President: एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन १७वे उपराष्ट्रपती

एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन १७वे उपराष्ट्रपती झाले आहे. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला आहे.

Mumbai Crime: विक्रोळी पार्कसाईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोन जणांना मारहाण

विक्रोळी पार्कसाईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोन जणांना मारहाण करून त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आणि ‘सर तन से जुदा’ चा फलक लावल्याची घटना समोर आली आहे. पार्कसाईट परिसरात छत्रपती संभाजी चौक वर ईद चे बॅनर लावण्यात आले होते, यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी तक्रार नीरज उपाध्याय जयेंद्र जाधव यांनी केली. मात्र या मुळे त्यांच्यात वाद झाला. या नंतर रात्री नीरज उपाध्याय यांच्या घराला आग लावण्यात आली, तसेच त्यांच्या घराबाहेर सर तन से जुदा, तन सर से जुदा असा फलक लावण्यात आला.

Igatpuri News: इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

दादर रेल्वे स्थानकाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतरासह विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडे इतर प्रमुख प्रलंबीत मागण्यांसाठी मंगळवार ( ता.९ रोजी ) इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात नांमातर न झाल्यास राज्यभर रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Jalgaon News: संत मुक्ताई संस्थानकडून दुर्गाताई मराठे यांना "आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार जाहीर"

वारकरी भूषण सहकार महर्षी संत मुक्ताबाई संस्थानचे माजी अध्यक्ष कै. भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिर जुने मंदिर (कोथळी)श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे पंचदिनी ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यतिथीदिनी, संस्थेच्या वतीने 'आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार' पहिला पुरस्कार संत मुक्ताई साहेबांच्या निष्ठावान सेवेकरी व कीर्तनकार ह.भ.प. सौ. दुर्गाताई संतोष मराठे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Raigad Live: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध

आमदार महेंद्र दळवी यांच्या तटकरे विरोधी वक्तव्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध सुरु झाले आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी यांनी शिवसेना आ. महेंद्र दळवी यांनी प्रत्योतर दिले आहे. सुनील तटकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवणारा अजून तरी रायगड जिल्ह्यात जन्माला आलेला नाही, अशा भाषेत सडेतोड उत्तर देत, स्वतः महेंद्र दळवी एकेकाळी सुनील तटकरे यांच्या विचारधारेवर काम करत होते याची आठवण सायली दळवी यांनी करून दिली.

Pandharpur-Mahad Road Widening: जमीन संपादन केल्याशिवाय पंढरपूर-महाड रस्ता रुंदीकरण नको

राष्ट्रीय महामार्ग डी.डी. आर. ९६५ म्हणजे पंढरपूर-महाड रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे भोर तालुक्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांची १०० हेक्टर जमीन प्रभावित होत आहे. शासनाच्या नियमानुसार योग्य भूसंपादन प्रक्रिया, मोबदला, आणि पुनर्वसनाची तरतूद न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता बांधकामाचे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासून तीव्र धरणे आंदोलन केले.

राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत महत्वाची बैठक

मंत्री अतुल सावे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे

परिणय फुके , बबन तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आली आहे

Kolhapur Live: गोकुळ दूध उत्पादक संघाची सभा प्रचंड गदारोळात संपन्न

सत्ताधाऱ्याकडून ही सभा सुरळीत आणि समाधानकारक संपन्न झाल्याचा दावा करण्यात आलाय, तर तर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेमध्ये आपल्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप व्यक्त केलाय. गोकुळची सभा सुरू होताना सभा मंडप तुडुंब भरला होता... मात्र सभा अर्धी होताच सभासदांनी देखील सभा मंडपातून काढता पाय घेतला.

Mumbai Live: डोंबिवलीत महिला चोराचा धुमाकूळ!

​भरदिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतून २० हजार लंपास

​गडबडीत दरवाजाला लॉक लावायला विसरले आणि चोरी झाली

​चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.

​पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी महिलेचा शोध सुरू

Mumbai Live:  मुंबई–आग्रा महामार्गावर गॅस टँकर अपघात, चालकाचा मृत्यू

मुंबई–आग्रा महामार्गावर राहूड घाट परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चांदवड–मालेगावच्या दिशेने जात असताना ट्रकने अचानक कट मारल्याने टँकर पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या १५ ते १६ तासांपासून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या अपघातात गॅस टँकर चालकाचा मृत्यू झाला असून पोलिस व प्रशासनाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे.

kolhapur live: गोकुळ दूध संघाच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या

गोकुळ दूध संघाची 63 वी सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली. सभासदांनी मंडप खचाखच भरून उपस्थिती लावली होती. मात्र, अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांचे भाषण संपताच मोठ्या संख्येने सभासदांनी बाहेरचा रस्ता धरला. परिणामी काही वेळातच मंडपातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या झाल्या आणि पुढील कार्यवाही जवळपास रिकाम्या आसनांसमोर पार पडताना दिसली.

Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन...

19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिंतन शिबिराचे आयोजन..

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सह पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, सह महाराष्टातील प्रमुख पदाधिकारी लावणार उपस्थिती....

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या चिंतन शिबिराला विशेष महत्व..

Live: आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधान ओलींनी देश सोडला

आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधान ओलींनी देश सोडला

Live: मतचोरी करून भाजप सत्तेत; माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप

केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ येथे केला.लोकशाही वाचवायची असेल तर यापुढे निवडणूक इव्हीएम मशीनवर नव्हे तर बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जानकर यांनी केली.

अक्कलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या गावात शून्य मते मिळाली. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 28सप्टेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली.

Mumbai News Live: प्रभादेवी पूल १० सप्टेंबरपासून बंद होण्याची शक्यता

मुंबई वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे की, एका मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून, प्रतिष्ठित एल्फिन्स्टन पूल १० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद राहील.

Palghar Live: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाने कमाल क्षमता गाठली आहे. सततचा पाऊस पडत असल्याने, भराव ओसंडून वाहू लागताच प्रशासनाने पाचही धरणांचे दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले आहेत. परिणामी, लाखो लिटर पाणी सोडले जात आहे आणि नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai News: गणेश विसर्जनात कृत्रिम तलावांसाठी बीएमसीकडून लाखो लिटर पाण्याचा वापर

यावर्षीच्या गणेशोत्सवात २९० कृत्रिम तलावांच्या स्थापनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) प्रशंसा मिळाली असली तरी, या दहा दिवसांच्या विसर्जनासाठी लाखो लिटर पाणी वापरले गेले. टँकर वापरून आणि विहिरींमधून पाणी उपसून कृत्रिम तलाव भरण्यात आले. नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यास मनाई असल्याने महापालिकेने यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली.

Mumbai News: माउंट मेरी जत्रेमुळे मुंबईत वाहतूक बदल

दरवर्षी, वांद्रे येथील माउंट मेरी बॅसिलिका या काळात लाखो पर्यटकांना भेट देतात. वांद्रे मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आणि माउंट मेरी चर्चमध्ये मदर मेरीच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज होत असताना, मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. माउंट मेरी जत्रा पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिमेकडील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

Mumbai Pune Live: पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर डंपर उलटला, वाहतूक विस्कळीत

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वडगावजवळ दगडी कोळसा घेऊन जाणारा एक डंपर उलटला. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येत असताना घडला. डंपर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या एका पिकअपने त्याला धडक दिली. या अपघातात डंपर चालक आणि पिकअप चालक किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. 

Dombivali Live: डोंबिवलीतील पलावा परिसरात बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग

डोंबिवलीतील पलावा परिसरात असलेल्या एका बिर्याणीच्या दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ‘के.जी.एन. बिर्याणी शॉप’ नावाच्या या दुकानात अचानक लागलेल्या या आगीने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले

Sangali Live: विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

सांगली जिल्ह्यातील अकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपींच्या घराजवळ मृतदेह ठेवून तीव्र निदर्शने केली. या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण अकली गाव बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सांगली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे.

Dhule LiveUpdate: अधुळ्यात स्कुटी आणि एसटी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात बारा वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, परिवहन महामंडळाच्या बसने साक्रीहून पिंपळनेर जात असताना कान नदीच्या पुलावर पिंपळनेर कडून साक्री कडे जाणाऱ्या दोन दुचाक्यांना धडक दिली,

Jogeshwari: जोगेश्वरी-वांद्रे द्रुतगती मार्गावर दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी

मुंबईत जोगेश्वरी ते वांद्रे दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे ६:१५ वाजताचे दरम्यान तब्बल 60 ते 70 दुचाकीस्वारांची उलटबाजी पाहायला मिळाली. या बाईकस्वारांनी ट्रिपल सीट, विनाहेल्मेट प्रवास करताना सायलेंसरचे प्रचंड आवाज काढत अत्यंत वेगाने दुचाकी चालवल्या. दुचाकी स्वरांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या प्रकरणी वाहतूक पोलीस या सर्व दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.या बेकायदेशीर रेसिंगमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

PM Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब, हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर 

उत्तर भारतात परामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब आणि हिमाचलमधील पूरग्रस्त भागाचा आज दौरा करणार आहेत.

Mumbai Live : मराठा आरक्षण समितीची आज पुन्हा बैठक 

मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक पार पडणार असून जीआरवर चर्चा होणार आहे.

Vice- President Election Live : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला.

Kolhapur Live : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी थेट कोल्हापुर- मुंबई सायकलवारी...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत अमरण उपोषण सुरू केलं होतं. या वेळी राज्यभरातून मराठा समाज मुंबईत आरक्षणाच्या लढाईसाठी धडकला. मराठ्यांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जी गाडी मिळेल त्याने जाण्यासाठी प्रयत्न केले. हजारोंच्या संख्येने मुंबईत मराठे जात असताना कोल्हापुरच्या एका पठ्ठ्याने आपल्या कृतीने अनेकांची मने जिंकली. कारण कोल्हापुरच्या एका गावातील हा पठ्ठ्या थेट मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भर पावसात सायकलवरून मुंबईकडे रवाना झाला होता. तो व्हिडिओ ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हाच पट्ट्या कोल्हापुरात परतला त्यावेळी गुलालाची उधळण करत त्याच स्वागत हे करण्यात आलं.

Maharashtra Live : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या पिक विमा योजनेला थेट उच्च न्यायालयात आव्हान

राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे असं असताना राज्य शासनाने पिक विमा योजनेमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यात मोठ्या अडचणी ठरत आहेत याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या पिक विमा योजनेला थेट उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी पिक विमा योजनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे येत्या 25 सप्टेंबर रोजी यासंदर्भामध्ये सुनावणी होणार आहे.

Mumbai Live : मराठा आरक्षणावरून भुजबळांची नाराजी कायम...मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार?

मराठा आरक्षणावरून भुजबळांची नाराजी कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते उपस्थित राहणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.

Maharashtra Live : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, मराठा म्हणून ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची मागणी

राजकीय पक्षासह आमच्या मराठा जातीतील काहीजण मराठा समाजाला कन्फ्युज मध्ये ठेवण्याचं काम परत आहेत,नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांची टीका

कुणबी प्रमाणपञ कधीही रद्द होवु शकत,त्यामुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण न देता थेट मराठा म्हणून आरक्षण द्याव मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

Palghar News Update : कर्मचारी संपावर, डॉक्टर नसल्यानं दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संपावर गेल्या मुळे रूग्णालयात तंत्र डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी दोन वर्षीय प्रियल सुरेश धिंडा या मुलीचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुलभाग असलेल्या जव्हार तालुक्यात आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले सर्व कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे जव्हार तालुक्याच्या मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या पतंगशाह कुटीर रुग्णालय येथील वैद्यकीय व्यवस्था अक्षरशः सलाईनवर चालू आहे.

Mumbai News Updates : मुंब्र्यात इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा मृत्यू

मुंब्रा इथं इमारतीच्या सज्जाचा भाग पडल्याने एक महिला जखमी तर एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झालाय. मुंब्रातील लकी कंपाऊंड येथील इमारत डी विंग ग्राउंड प्लस तीन माळ्याची बिल्डिंग आहे. या इमारतीला एक टेरेस रूम देखील असून इमारत 25 वर्षे जुनी आहे. इमारतीच्या सज्जाचा भाग अंगावर पडल्याने दोन महिला जखमी झाल्या होत्या. यातील एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News Updates : सरकारचा १२ लाखांचा महसूल बुडाला, महसूल मंत्री बावनकुळेंनी महिला अधिकाऱ्याचं केलं निलंबन

सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केलीय. संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचा 12 लाख 61 हजार 271 रुपयांचा महसूल बुडाल्याचा प्राथमिक ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत 28 ऑगस्ट रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयाची अचानक पाहणी केली होती. यावेळी कार्यालयात केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचे पाहून महसूलमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Pune News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरणी ६ जणांना अटक

पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीच्या ६ जणांना अटक करण्यात आलंय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना काल रात्री उशीरा अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांमध्ये अंधेकरांच्या कुटुंबातील चार लोक आहेत तर दोन बाहेरचे आहेत. सध्या या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या सर्वांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT