Jairam Ramesh vs Pramod Krishnam esakal
देश

'क्षणाचाही विलंब न करता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा'

सकाळ डिजिटल टीम

आमदारांच्या बंडामुळं शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) दोन दिग्गज नेते ट्विटरवर एकमेकांना भिडल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम (Pramod Krishnam) यांनी ट्विट केलंय की, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मराठा (Maratha) स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी नैतिक मूल्यांचं पालन करताना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यास क्षणाचाही विलंब करू नये, असं त्यांनी नमूद केलंय.

दरम्यान, प्रमोद कृष्णम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. रमेश म्हणाले, कृष्णम याचं वक्तव्य ना काँग्रेस पक्षाचं मत आहे, ना आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत. यावर प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, सत्ता तात्पुरती असते. मात्र, मी कायम आहे. तरीही तुम्हाला काही अडचण असेल, तर 'जयराम'! ज्यांनी सत्तेला कधीच महत्त्व दिलं नाही, त्यांचा आदर केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) विरोधात पक्षाच्या अनेक आमदारांनी बंडाचा बिगुल फुंकलाय. शिंदे आणि इतर बंडखोर आमदार बुधवारी पहाटे सुरतहून आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले. शिंदेंनी आपल्या बाजूनं 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं पालन करावं, असं बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे.

या बंडामुळं शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय. एवढंच नाही तर या घटनेमुळं शिवसेनेतही तेढ निर्माण झालाय. सरकार अडचणीत असल्याचे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. बुधवारी रात्री ते कुटुंबासह 'वर्षा' या सरकारी बंगल्यातून 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी गेले आहेत. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे 55 आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT