Sudhanshu Trivedi Esakal
देश

Sudhanshu Trivedi: “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

भाजपच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले आहे

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, ट्विटमध्ये ते म्हणतात की, "शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा" आणि त्यांनी ट्विट करताना #भाजप प्रवक्ता हा टॅग दिला आहे.

राहुल गांधींनी सावरकरांवरती केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ या वृत्तसंस्थेने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य चर्चासत्रात बोलताना सुधांशु त्रिवेदी यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंबधीचा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

Mandwa Gateway Ferry Suspension: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद

Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

तुम्हाला माझी जात माहितीये का? नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, नितीन गडकरींसमोर म्हणाले, 'माझ्या आईने मला...'

SCROLL FOR NEXT