mahatma gandhi nathuram godse esakal
देश

गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याची रणजीत सावरकरांची मागणी; ''गांधींचा मृत्यू नथुरामच्या गोळीने नव्हे तर...''

महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेच्या बंदुकीच्या गोळीने झालेली नाही. गांधींच्या जखमा आणि नथुरामकडील पिस्तुल, यामध्ये तफावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी आयोग नेमा, अशी मागणी रणजीत सावकर यांनी केली आहे.

संतोष कानडे

मुंबईः महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेच्या बंदुकीच्या गोळीने झालेली नाही. गांधींच्या जखमा आणि नथुरामकडील पिस्तुल, यामध्ये तफावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी आयोग नेमा, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

'एबीपी माझा'शी बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतर महात्मा गांधी यांच्या शरीरावर झालेल्या जखमा ह्या ४.२३ एमएम आणि ६.५ एमएम अशा होत्या. नथुरामचं पिस्तुल हे ९ एमएमचं होतं. शिवाय ज्या दिशेने गोळ्या झाडलेल्या आहेत त्या दिशादेखील निराळ्या आहेत.

सावरकर पुढे म्हणाले, नथुरामच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या असत्या तर त्याची डायरेक्शन सरळ पाहिजे होती, ती नाहीये. पॉईंट २२ किंवा पॉईंट २५ अशा पिस्तुलातून गांधींवर गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. ज्यांनी ती हत्या केली त्यांना लपवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कसून चौकशी केली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलीय.

''गांधी हत्येनंतर तत्कालीन सरकारने तेव्हा कपूर कमिशन नेमला होता, तसाच आता दुसरा कमिशन नेमण्याची गरज आहे. दडपलेले सगळे पुरावे बाहेर काढून प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी'' अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT