देश

राष्ट्रपती कोविंद, PM मोदींनी राजघाटावर गांधीजींना वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्पमाला अर्पण केली.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narandra Modi) यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हेसुद्धा राजघाटावर श्रद्धधांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्पमाला अर्पण केली. आज सायंकाळी पाच वाजता मोदी ३० जानेवारी मार्ग (बिर्ला हाऊस) इथं जाणार आहेत. ते भजनात सहभाग घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहताना म्हटलं की, पुण्यतिथिनिमित्त बापूंची आठवण. गांधीजींनी घालून दिलेले आदर्श आणखी लोकप्रिय करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आम्ही करत आहे. आज शहीद दिनानिमित्त देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व महापुरुषांना आदरांजली. त्यांची सेवा आणि शौर्य नेहमीच स्मरणात राहील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातमध्ये आहेत. त्यांनी अहमदाबादमधील साबरमती नदीच्या किनारी गांधीजींच्या भित्तीचित्राचे अनावरण केले.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं की, त्याग, तपस्येचा प्रेरणास्रोत. जगाला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेसाठी प्रेरित करून शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT