महंत नरेंद्रगिरी
महंत नरेंद्रगिरी sakal
देश

महंत नरेंद्रगिरी मृत्यु प्रकरण : दोषींना सोडणार नाही - योगी

पी. बी. सिंह

प्रयागराज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बाघम्बरी मठात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून दोषींना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे आहे. महंतांचे शिष्य अनंत गिरी याला पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर अटक करून त्याविरोधात गुन्हा दाखल केला. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे बुधवारी (ता.२२) अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी सकाळी दहा वाजता पंचांची बैठक होणार आहे. पोस्टमार्टेमनंतर दुपारी १२ नंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

बाघम्बरी मठात सोमवारी महंत संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आले. घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत नरेंद्रसिंह यांचे शिष्य आनंद गिरी याच्यासह अनेकांचा उल्लेख आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज नरेंद्रगिरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. महंतांच्या संशयास्पद मृत्युसंबंधी अनेक पुरावे गोळा केले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस उपमहानिरीक्षक अशा वरिष्ठ पातळीवरील पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. या घटनेत कोणीही उलटसुलट वक्तव्य करू नये. तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्या, अशी विनंतीही त्यांनी केली.

‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

आनंद गिरी हे बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याने आत्महत्या करत असल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. ‘हरिद्वार येथे संगणकाच्या माध्यमातून माझ्या एका व्हिडिओमध्ये महिलेचे छायाचित्र टाकत आनंद गिरी हा माझी बदनामी करणार असल्याचे आज मला समजले. माझ्या मृत्यूला आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी हे जबाबदार आहेत,’ असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॅट्ट्रिक झाल्यास कुठे होणार PM Modi यांचा शपथविधी? राष्ट्रपती भवनात शपथ घ्यायला भाजपचा नकार

Pune News: पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले, शिरुरच्या अरणगावमधील घटना

Gautam Adani: गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 4,54,73,57,37,500 रुपयांची वाढ

Cricket: गोंधळच गोंधळ! रनआऊटसाठी बॉल हातातच यईना, छोट्या फिल्डर्सची पळता भुई थोडी, पाहा मजेशीर Viral Video

Pune News: कर्वे रोडवर दुर्दैवी अपघात; क्रेनखाली येऊन सायकलस्वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT