देश

Mahesh Kumawat: संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?

हा तरुण या कटातील एक प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टात त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. (Mahesh Kumawat sixth accused in Parliament security breach case arrested by Delhi Police)

कोण आहे हा तरुण?

महेश कुमावत असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो राजस्थानच्या नागाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो १३ डिसेंबर रोजी दिल्लीत आला होता. याच दिवशी लोकसभेत दोन तरुणांनी व्हिजिटर गॅलरीतून खाली उडी घेत स्मोक कॅनिस्टर उडवली होते. यामुळं संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यामुळं देशभरात मोठा धक्का बसला होता. (Latest Marathi News)

चार जणांचे मोबाईल नष्ट केले

महेश हा या कटातील एक प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर ललित झा हा तरुण दिल्लीतून पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. महेशनं ललितच्या मदतीनं इतर चार आरोपींचे मोबाईल फोन उद्ध्वस्त केले होते. (Marathi Tajya Batmya)

ललित आणि महेश हे दोघेही दिल्ली पोलिसांकडं गुरुवारी स्वतःहून हजर झाले होते. यामध्ये ललितला शुक्रवारी अटक दाखवण्यात आली असून आज महेश कुमावत याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT