Mahua Moitra FIR Esakal
देश

Mahua Moitra FIR: बेताल वक्तव्य भोवलं! महुआ मोईत्रांविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

NWC: मोईत्रा यांच्या पोस्टवर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले होते.

सकाळ वृत्तसेवा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, महुआ मोइत्रा यांच्यावर सोशल मीडिया पोस्टद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

यावर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले होते.

या प्रकरणी रेखा शर्मा यांनी पोलिसांच्या विशेष शाखेकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (बीएनएस) मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मोईत्रा यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून रेखा शर्मा यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. मोईत्रा यांनी केलेल्या पोस्ट संदर्भातील सविस्तर माहिती पोलिसांनी ‘एक्स’ कडून मागवली आहे.

मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे अथवा खाणाखुणा करणे यासाठी हे कलम लावले जाते.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेखा शर्मा यांनी हाथरसचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना मोईत्रा यांनी वादग्रस्त टिपणी केली होती.

मोईत्रा यांच्यावर त्यानंतर भाजपने टीका केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील मोईत्रा यांचे विधान धक्कादायक असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT