Mahua Moitra Loksabha Sakal
देश

महागाईवरच्या गदारोळात महुआ मोईत्रांनी हळूच लपवली दोन लाखांची बॅग

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लुई विट्टोन ब्रँडच्या आपल्या पर्सला लपवल्याने त्यांची चर्चा होत आहे. लोकसभेच्या सत्रादरम्यान बॅग लपवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Mahua Moitra in Loksabha)

लोकसभेच्या सत्रादरम्यान, महागाईवर, दरवाढीवर चर्चा सुरू होती. त्यांच्याच शेजारी उभ्या राहून खासदार ककोली घोष दस्तीदार या तावातावाने महागाईबद्दल बोलत होत्या. कसं महागाईमुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय, याबद्दल आक्रमकपणे भूमिका मांडत होत्या. दरम्यान, शेजारीच बसलेल्या महुआ मोईत्रा यांनी आपली महागडी बॅग हळूच पायाखाली सरकवली.

या लुई विट्टोन बॅगची किंमत दीड लाखाहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन नेटकऱ्यांनी महुआ मोईत्रा यांना लक्ष्य केलं आहे.एकीकडे महागाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जातोय. आणि दुसरीकडे खासदारांकडे जवळपास दोन लाखांची बॅग...हा विरोधाभास नेटकऱ्यांना काही रुचलेला दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT