Mahua Moitra Viral Tweet Sakal
देश

"फोन नंबर दिल्याशिवाय ट्राउझर्सदेखील...",महिला खासदाराची 'डिकेथलॉन'वर टीका

खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी एका ट्वीट करून स्पोर्टिंग ब्रँड डेकॅथलॉनविरुद्ध तक्रार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी एका ट्वीट करून स्पोर्टिंग ब्रँड डेकॅथलॉनविरुद्ध तक्रार केली आहे. फोन नंबर दिल्याशिवाय वडिलांसाठी ट्राउझरसुद्धा खरेदी करू शकत नाही, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आज दुपारी दिल्ली-एनसीआरमधील अन्सल प्लाझा येथील डेकॅथलॉन स्टोअरला भेट दिल्यानंतर आलेला अनुभव, महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून शेअर केला आहे. (Mahua Moitra Viral Tweet on Decathlon)

महुआ मोईत्रा त्यांनी वडिलांसाठी डेकॅथलॉनमधून एक ट्राउझर विकत घेतली. त्यानंतर बिलिंग काउंटरवर त्यांना त्यांचा फोन नंबर आणि ईमेल पत्ता देण्यास सांगितले. नाराज महुआ मोइत्रा यांनी नकार दिला आणि थेट स्टोअरमधून ट्विट केले, 'गोपनीयता कायदा आणि ग्राहक कायद्यांचे उल्लंघन' असं म्हणत त्यांनी डेकॅथलॉनवर टीका केली.

“मला माझ्या वडिलांसाठी डेकॅथलॉनमधून 1499 रुपयांची ट्राउझर (पॅण्ट) रोख खरेदी करायची होती. तेथील मॅनेजरनं ट्राउझर खरेदी करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. माफ करा डेकॅथलॉन, तुम्ही याचा आग्रह धरून गोपनीयता कायदे आणि ग्राहक कायद्यांचे उल्लंघन करत आहात. मी सध्या स्टोअरमध्ये आहे (sic.),” असं महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले.

मॅनेजरने शेवटी त्याचा नंबर टाकला आणि मला स्टोअरमधून वडिलांच्या ट्राउझरसह बाहेर जाऊ दिलं. पण डेकॅथलॉनला पुनरावलोक करण्याची गरज आहे, असे ट्वीट त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT