Saw mill esakal
देश

गुजरातमध्ये सॉ मिलला भीषण आग

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधील वडोदरा शहरातील हरणी भागात एका सॉ मिलला (Saw mill) मोठी आग लागली आहे.

गुजरात : गुजरातमधील (Gujrat) वडोदरा शहरातील हरणी भागात एका सॉ मिलला (Saw mill) मोठी आग लागली असून ही आग जवळच्या दोन मिलमध्येही पसरलीय. दरम्यान, वडोदरा अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनानं (VFES) आग विझवण्यासाठी शहरातील सहा अग्निशमन केंद्रांमधून 16 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 40 अग्निशमन दलाचे कर्मचारी पाठवले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आलाय.

सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास हरणी येथील व्हीएफईएस अग्निशमन केंद्राला जलाराम टिंबर मार्टच्या आवारात आग लागल्याची माहिती मिळाली. आगीची तीव्रता पाहून व्हीएफईएसनं शहरातील विविध अग्निशमन केंद्रातून दहा अग्निशमन दल रवाना केले. तसेच शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

वडोदरातील गोदाम प्रामुख्यानं प्लायवूडनं बनवलेलं होतं, त्यामुळेच आग झपाट्यानं पसरली. बाजूच्या इतर दोन लाकडी गोदामालाही आग लागलीय. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दाट लोकवस्तीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच खबरदारी म्हणून काही घरं रिकामी करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT