Accident News esakal
देश

Accident News : घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर ट्रक उलटला; आठ जणांचा मृत्यू

मल्लवा ठाण्याच्या कटरा विल्हौर रस्त्यावर एका झोपडीमध्ये हे कुटुंब वास्तव्याला होतं. रात्री एकत्र जेवण करुन सर्वजण घराबाहेर झोपी गेले. तेव्हा अचानक रात्री उशिरा वाळूने ओव्हरलोड असेलल्या ट्रकवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर ट्रक उलटला.

संतोष कानडे

हरदोईः घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर ट्रक उलटल्याने तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यातील मल्लवा ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. घटनेमध्ये एक चिमुकली जखमी झाली आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं. जेसीबी आणि हायड्राच्या माध्यमातून ट्रकखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मल्लवा ठाण्याच्या कटरा विल्हौर रस्त्यावर एका झोपडीमध्ये हे कुटुंब वास्तव्याला होतं. रात्री एकत्र जेवण करुन सर्वजण घराबाहेर झोपी गेले. तेव्हा अचानक रात्री उशिरा वाळूने ओव्हरलोड असेलल्या ट्रकवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर ट्रक उलटला.

घटनेमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. जेसीबी आणि हायड्राच्या मदतीने ट्रकखाली दबलेले मृतहेद बाहेर काढण्यात आले.

अपघाताच्या या घटनेत केवळ एक चिमुकली वाचली आहे. जखमी झाल्याने तिल्या रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT