A tragic accident caused by Chinese manja during Makar Sankranti, highlighting the deadly risks of illegal kite strings on public roads.

 

esakal

देश

Makar Sankranti Tragedy : मकर संक्रातीच्या सणाला गालबोट! लेकीला घरी आणायला निघालेल्या पित्याचा वाटेतच चायनीज मांजाने घेतला बळी

tragic accident caused by Chinese manja during Makar Sankranti : जाणून घ्या, कुठं घडली ही अतिशय दु:खद घटना; दुचाकीवरून जात असताना गळ्या भोवती अडकला मांजा अन् तुटली आय़ुष्याची दोर

Mayur Ratnaparkhe

illegal chinese manja : कर्नाटकातील बिदर येथे मकर संक्रांतीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यामुळे या सणाला एकप्रकारे गालबोट लागल्याचे समोर आळे आहे. या ठिकाणी पंतगाच्या मांज्यामुळे एका दुचाकीस्वाराचा गळा कापला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 त्यांचे नाव संजय कुमार होसनमणी (४८) असे आहे, तो बिदर तालुक्यातील बांबुलगी गावचा रहिवासी आहे. चिटगुप्पा तालुक्यातील तलामडगी गावाजवळ रस्त्यावर लोंबकळत असलेला चायनीज मांजा अचानक त्यांच्या गळ्याला अडकला आणि यामुळे त्यांचा गळा चिरला गेला. परिणामी ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्यांचा गळ्यातून अधिकच रक्तस्त्राव झाला यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार संजय कुमार हे संक्रांतीच्या उत्सवासाठी त्यांच्या मुलीला तिच्या वसतिगृहातून घरी आणण्यासाठी हुमनाबादला जात होते. दरम्यान वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मन्नेखल्ली सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

खरंतर चायनीज मांजावर बंदी आहे. मात्र तरीही काही ठिकाणी चोरी-छुप्या पद्धतीने याची विक्री होते. अनेक ठिकाणांहून हा मांजा जप्त केला गेलेला आहे. परंतु याचा वापर पूर्णपणे थांबलेला नसल्याने अशा दुर्घटना दरवर्षी घडतात. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर हा मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT