देश

सावत्र बाप ठरला नराधम! 5 वर्षांच्या मुलासोबतची क्रूरता पाहून उसळेल रक्त

सकाळ डिजिटल टीम

कुणाही लहान मुलाच्या आयुष्यामध्ये त्याच्या वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वडिलांच्या संगोपनाचा त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होत असतो. त्यांनी केलेली जडणघडणच त्याच्या पुढील आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यांनी केलेले संस्कारचं त्याला भावी आयुष्यात एक चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी प्रेरित करत असतात. मुलाचा पिता म्हणून आपल्या मुलाला जगातील अडचणींबाबत सांगून त्याला जगाशी टक्कर देण्यासाठी अधिकाधिक सुदृढ बनवण्याचं काम पिताच करत असतो. पिताच आपल्या मुलाच्या सर्वप्रकारच्या गरजांना पूर्ण करत असतो. मात्र, काहीवेळा असेही काही पिता पहायला मिळतात, जे स्वत:चं आपल्या मुलांच्या नुकसानीस जबाबदार ठरतात. असे पिता हैवानासारखेच वागत असतात. सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या मुलाबाबत घडणारी एक अशीच स्टोरी शेअर केली आहे.

एका महिलेने फक्त या कारणास्तव दुसरं लग्न केलं होतं की, तिच्या पाच वर्षांच्या मुलाला वडिलांचं प्रेम मिळू शकेल. मात्र, हीच तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक ठरलीये. कारण त्या सावत्र पित्याने त्या महिलेच्या मुलावर असे अत्याचार केले की त्याचं आयुष्यचं बिघडून जाण्याच्या मार्गावर आहे. आपल्या मुलावर दररोज होत असलेल्या या अत्याचारानंतर त्या महिलेने या सावत्र पित्याची क्रूरता जगासमोर आणण्यासाठी त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओनंतर आता पोलिस या व्यक्तीचा तपास करत आहे. ही घटना मलेशियातील शाह आलम मधील आहे.

सोशल मीडियावरील Panglima Perang RimauNaga नावाच्या या महिलेने एका पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचंही रक्त उसळेल. या व्हिडीओमध्ये तीस वर्षांचा ट्रक ड्रायव्हर आपल्या सावत्र मुलाला अगदी निर्दयीपणे बडवताना आणि मारताना दिसत आहे. त्याच्या या मारहाणीमुळे हा मुलगा भीतीने ओरडत होता आणि किंचाळत होता. तरी हा नराधम बाप थांबताना दिसून येत नाहीये. व्हिडीओमध्ये दिसतंय की, हा नराधम बाप त्या मुलाचे हात पिरगाळतो आहे. यानंतर ती महिला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करते मात्र, तरीही हा बाप थांबण्याचं नावच घेत नाही.

महिलेने आपल्या दुसऱ्या पतीची ही क्रूर कृती कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. तिने आपल्या बेडरुममध्ये हा कॅमेरा लपवून हा व्हिडीओ शूट केला आहे. महिलेने सांगितलंय की, तिने कधीच असा विचार केला नव्हता की, तिच्या मुलासोबत असं वर्तन केलं जाईल. या दोन मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओला पाहून तुमच्याही अंगावर भीतीने काटा येईल. सध्या या व्हिडीओच्या व्हायरल होण्यानंतर पोलिस त्या नराधम बापाचा शोध घेत आहेत. असं म्हटलं जातंय की, या महिलेने गेल्या महिन्यातच दुसरं लग्न केलं होतं. मात्र, त्या पित्याने दुसऱ्याच महिन्यात तिच्या मुलासोबत अत्यंत क्रूर वर्तनास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT