indian navy  File photo
देश

क्वाड देशांच्या नौदलांचा सराव सुरू, बंगालच्या उपसागरात युद्धनौका तैनात

मलबार सरावात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा सहभाग असेल.

ओमकार वाबळे

भारतीय नौदलाच्या युद्धनौका क्वाड देशांच्या मलबार सरावातील दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत. बंगालच्या उपसागरात हा सराव पार पडेल. त्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा सहभाग असेल.

या सरावाचे स्वरुप बहुस्तरीय असणार आहे. नौदलाच्या आयएनएस रणविजय, आयएनएस सातपुडा, पी८आय या दीर्घ पल्ल्याच्या सागरी गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या नौका यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच लढाऊ विमानं आणि एका पाणबुडीचाही यामध्ये समावेश आहे. अमेरिकेची कार्ल विन्सन ही लढाऊ विमानवाहू युद्धनौका लेक चॅमप्लेन व स्टॉकडेल या दोन नौका सहभाग घेतील.

तर, जपानच्या सागरी संरक्षण दलाच्या कागा आणि मुरासामे या युद्धनौका, आणि ऑस्ट्रेलियाच्या बॅलारट आणि सिरीयुस या युद्धनौका या युद्ध सरावात भाग घेणार असल्याची माहिती नौदलाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

दरम्यान, मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. यावेळी क्वाड देशांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. क्वाड्रिलॅटरल डायलॉग मार्फत विविध मुद्दयांवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

SCROLL FOR NEXT