crime News sexual harassment case  sakal
देश

Harassment: पत्रकार महिलेवर पुरुष सहकाऱ्याची कपड्यांवरुन आक्षेपार्ह टिप्पणी! हायकोर्टात घडला प्रकार

महिलेनं उपस्थित केला लैंगिक अत्याचाराचा मुद्दा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कायदेविषयक बातम्या देणाऱ्या न्यूज पोर्टलच्या एका पत्रकार महिलेवर एका नामांकित न्यूज एजन्सीत काम करणाऱ्या पत्रकार पुरुषानं तिच्या कपड्यांवरुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचं प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर संबंधित महिलेनं ट्विट करत आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाची ट्विटद्वारे माहिती दिली. तसेच हा मुद्दा लैंगक अत्याचाराचा मुद्दा नाही का? असा सवाल तीनं केला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टात हा प्रकार घडला आहे. (male colleague passes offensive comment on woman journalist in Madras High Court aau85)

पीडित महिलेनं ट्विटद्वारे आरोप केला की, मी मद्रास हायकोर्टात ड्रेस घालून आले होते. हा ड्रेस लांब आणि पूर्ण बाह्यांचा होता, जो कोणत्याही प्रकारे उत्तेजित करणारा नव्हता. पण हायकोर्टातील पत्रकार कक्षात मात्र पीटीआय पत्रकारानं मला इतरांच्या उपस्थितीत विचारले की, मी आत काही घातले आहे का? आणि त्यानंतर सर्वजण त्यावर हसले. खरं तर हा असा पोशाख आहे जो मी मुंबई हायकोर्टात रिपोर्टिंगवेळा अनेकदा परिधान केला आहे आणि तिथं कोणीही माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं नाही. मी ३७ वर्षांची आहे, जुळ्या मुलांची आई आहे. सध्या मी कायम स्वरुपी कोर्ट रिपोर्टर म्हणून काम करते आहे. मी यापूर्वी कधीही अशा टिप्पणीचा सामना केलेला नाही.

संबंधित पुरुष रिपोर्टरच्या या टिप्पणीनंतर जेव्हा मी त्याला सांगितले की, मी अशा टिप्पण्या हलक्यात घेत नाही. तेव्हा त्याने पहिल्यांदा आपल्या बोलण्यात काय चूक आहे हे समजत नसल्याचं नाटक केलं. मग म्हणाला, "आम्ही इथे काही मानकं पाळतो. तुम्हाला अशा ड्रेसमध्ये कोर्टात येण्यास कशी परवानगी मिळाली?" याप्रकारानंतर मी 'POSH कमिटी' जी महिलांवरील आक्षेपार्ह जोक्सना लैंगिक छळ मानते. या कमिटीकडे मी याची तक्रार केली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले इतर पत्रकार माझ्याकडे आले आणि मला त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यास सांगून, तो सर्वांशी अशाच विचित्र प्रकारे वागत असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

पीडित महिलेच्या ट्विटला दिला रिप्लाय

ज्या वृत्तसंस्थेतील पुरुष पत्रकारानं ही आक्षेपार्ह टिप्पणी केली त्या संस्थेनं पीडित पत्रकार महिलेच्या ट्विटला प्रतिसाद दिला. यात म्हटलं की, "तुम्ही आमच्या एक मौल्यवान माजी सहकारी आहात. तुम्ही आरोप केलेली व्यक्ती एक स्वतंत्र वकील आहे जी अधूनमधून आम्हाला चेन्नईतील कायदेशीर घडामोडींची माहिती देण्याचं काम करते. पण तुमच्याबाबत घडलेला प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही तुमच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही याचा संस्थांतर्गत तपास सुरू केला आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही आमची मूल्ये आणि तत्त्वांनुसार त्याच्याशी असलेला आमचा संबंध तोडू. तो आमचा कर्मचारी नाही. उलट कायदेशीर अधिकारानुसार आम्ही तुम्हाला योग्य प्राधिकरणांकडे औपचारिक तक्रार करण्याचं आवाहन करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT