देश

मल्ल्याचे प्रत्यार्पण रखडणार? 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने गुरुवारी (ता. 14) ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास त्याचे प्रत्यार्पण आणखी काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे. 

वेस्टमिनिस्टर न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला संमती दर्शविल्यानंतर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. मल्ल्याने या निर्णयाविरोधात अपिलासाठी उच्च न्यायालया धाव घेतली असून, या अर्जावर निर्णय घेण्यासाठी 2 ते 4 आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे. न्यायालयाने त्याचा अर्ज स्वीकारला तर, या प्रकरणी पुन्हा सुनावणीची शक्‍यता असून, या प्रक्रियेला 5 ते 6 महिने लागतील, अशी माहिती न्यायालय प्रतिनिधीने दिली. 

न्यायालयाने मल्ल्याच्या अर्ज फेटाळल्यास त्यावर "रिन्यूअल फॉर्म' सादर करण्याचा पर्यायही मल्ल्यासमोर आहे. या प्रक्रियेअंतर्गत न्यायालय या प्रकरणी पूर्ण सुनावणी घ्यायची की नाही, याचा निर्णय घेईल. ही प्रक्रिया लंडनमधील रॉयल न्यायालयात होईल. प्रत्यक्ष सुनावणीसाठी न्यायाधीशांची उपलब्धता व इतर कारणांमुळे यालाही काही महिनांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. एकंदरीत या प्रकियेमुळे मल्ल्याचे प्रत्यार्पण काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय 

या प्रकरणी उच्च न्यायालय जो काही निर्णय देईल, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्यायही भारत व मल्ल्यासमोर आहे. ब्रिटनमध्ये सर्वोच्च न्यायालयात एखाद्या निर्णयाविरोधात अपील करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने या सबंध प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT