Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

Indian CEO In USA: अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे सीईओ आहेत. त्यामुळेच आता अमेरिकेत ‘कंपनीचा सीईओ होण्यासाठी भारतीय असणे आवश्यक आहे’ असे वक्तव्य अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले.
Can't be a CEO in America if you aren't an Indian quips US Ambassador Garcetti
Can't be a CEO in America if you aren't an Indian quips US Ambassador Garcetti Sakal

Indian CEO In USA: अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे सीईओ आहेत. त्यामुळेच आता अमेरिकेत ‘कंपनीचा सीईओ होण्यासाठी भारतीय असणे आवश्यक आहे’ असे वक्तव्य अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले. ते म्हणाले की, पूर्वी यूएसएमध्ये असे म्हटले जात होते की जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्ही अमेरिकेत कोणत्याही कंपनीचे सीईओ बनू शकत नाही.

वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत एरिक गार्सेट्टी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांचे कौतुक केले आणि अमेरिकेच्या विकासात त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. गार्सेट्टी म्हणाले की, अमेरिकेत जाऊन भारतीयांनी मोठा बदल केला आहे.

Can't be a CEO in America if you aren't an Indian quips US Ambassador Garcetti
Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

तसे, सध्या अमेरिकेत भारतीयांबद्दल जो विनोद केला जात आहे तो चुकीचा नाही. कारण, गुगलपासून मायक्रोसॉफ्टपर्यंतची कमान भारतीय वंशाच्या लोकांच्या हाती आहे. सुंदर पिचाई हे गुगल म्हणजेच अल्फाबेट सीईओ आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आहेत. Adobe चे CEO देखील भारतीय वंशाचे शंतनू नारायण आहेत. यूट्यूबची जबाबदारीही भारतीय वंशाच्या नील मोहन यांच्या हातात आहे. IBM चे CEO देखील भारतीय वंशाचे अरविंद कृष्ण आहेत.

अग्रगण्य अमेरिकन फार्मा कंपनी नोव्हार्टिसचे सीईओ देखील भारतीय वंशाचे वसंत नरसिंहन आहेत. स्टारबक्सचे प्रमुख लक्ष्मण नरसिंहन आहेत आणि संजय मेहरोत्रा ​​अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ आहेत, जी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करत आहे. हनीवेलचे नेतृत्व भारतीय वंशाचे विमल कपूर करत आहेत. अमेरिकन कंपनी NetApp चे CEO देखील भारतीय वंशाचे जॉर्ज कुरियन आहेत.

Can't be a CEO in America if you aren't an Indian quips US Ambassador Garcetti
US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

FedEx चे संस्थापक आणि CEO फ्रेड स्मिथ यांनी 2022 मध्ये अमेरिकन कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर विराजमान असलेल्या भारतीयांबद्दल एक विधान केले होते. ते म्हणाले होते की भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांनी अमेरिकन अर्थव्यवस्था आणि अमेरिका ताब्यात घेतली आहे. सन 2022 मध्ये, Fedex ने फ्रेड स्मिथला काढून टाकले आणि कंपनीची कमान भारतीय वंशाच्या राज सुब्रमण्यमकडे दिली. या बदलानंतरच स्मिथने भारतीयांबद्दल टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com